शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

Man Vs Wild: माझं पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही; बेअर ग्रिल्ससोबत मोदींची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 08:21 IST

निराशेबद्दल मोदींचा तरुणाईला मोलाचा सल्ला

नवी दिल्ली: डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेली सफारी काल पाहायला मिळाली. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. यामध्ये मोदींनी ग्रिल्ससोबत संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. मला कधीच नकारात्मकता जाणवत नाही. माझं पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी ग्रिल्सशी 'मन की बात' केली. फेब्रुवारीमध्ये उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट उद्यानात या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात नैसर्गिक आव्हानांचा समर्थपणे सामना करणाऱ्या मोदींचं ग्रिल्सनं कौतुक केलं. माझा दृष्टीकोन विकासाचा आहे आणि लोकांची स्वप्नं पूर्ण करुन मला आनंद मिळतो, असं मोदी यांनी ग्रिल्सला सांगितलं. माझं पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. तुम्हाला आयुष्यात कधी नकारात्मकता जाणवली का, असा प्रश्न ग्रिल्सनं विचारला. त्यावर तो माझ्या स्वभावाचा भागच नसल्याचं उत्तर मोदींनी दिलं. ग्रिल्सच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात सहभागी झालेले मोदी हे दुसरे राष्ट्रप्रमुख ठरले. याआधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा या कार्यक्रमात दिसले होते. बेअर ग्रिल्ससोबत साधलेल्या संवादातून मोदींनी तरुणांना सल्लादेखील दिला. 'तुमच्या आयुष्याकडे तुकड्या तुकड्यांच्या स्वरुपात पाहू नका. जीवनाकडे व्यापक नजरेनं पाहा. जगताना चढ-उतार येणारच. आयुष्यात वाईट टप्पा आल्यावर त्याबद्दल फार विचार करू नका. कारण वर जाणारा रस्ता खालूनच सुरू होणार असतो,' असं मोदी म्हणाले. 'मला आयुष्यात कधीही नकारात्मकता किंवा भीती जाणवली नाही. कारण मी खूप सकारात्मकपणे विचार करतो. माझा स्वभावच तसा आहे. मी प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता पाहतो. त्यामुळेच कधीच माझा अपेक्षाभंग होत नाही,' अशा शब्दांत मोदींनी तरुण पिढीला मार्गदर्शन केलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी