शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

Juhi Chawla News: घूंघट की आड से दिलबर का... 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावलाची गाणी ऐकू येऊ लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 18:58 IST

Juhi Chawla 5g petition News: न्यायमूर्ती आर मिढा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. या आधी न्यायालयाने आपली बाजू मांडण्यासाठी जुही चावलाला एक संक्षिप्त माहिती देण्यास सांगितले होते.

सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) हिने ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानामुळे माणसालाच नव्हे तर एकूण जीवसृष्टीलाच धोका असल्याच्या शक्यतेविषयी दिल्लीउच्च न्यायालयात याचिका (5g petition) दाखल केली आहे. यावर आज दुपारी 3 वाजता सुनावणी झाली. न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला आहे. तसेच सरकारशी संपर्क करण्याऐवजी थेट न्यायालयात का हा विषय घेऊन आला, असा प्रश्न चावलाला विचारला आहे. (Please mute, says judge as man sings 'Ghoonghat ki..' seeing Juhi Chawla at 5G hearing)

न्यायमूर्ती आर मिढा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. या आधी न्यायालयाने आपली बाजू मांडण्यासाठी जुही चावलाला एक संक्षिप्त माहिती देण्यास सांगितले होते. दुरसंचार विभागाच्या वतीने वकील अमित महाजन यांना देखील दीड पानांची माहिती देण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. दुपारी 3 वाजता या याचिकेवर सुनावणी झाली. 

सुनावणी सुरु असताना एक मजेशीर परंतू अजब घटना घडली. यामुळे न्यायालयाचे कामकाज काही वेळ प्रभावित झाले. जुही चावलाच्या या याचिकेवरील सुनावणी ही व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे होत होती. यावेळी एक व्यक्त मध्येच जुही चावलाच्या सिनेमांतील गाणी गात होता. वारंवार असे होत राहिल्याने न्यायालयाच्या कामात अडथळा येऊ लागला. या व्यक्तीने या सुनावणीवेळी जुही चावलाचे गाणे 'घूंघट की आड़ से दिलबर का...' गायले. यानंतर त्याने तिची आणखी काही गाणी गायली. 

कामकाजात खंड पडत असल्याचे पाहून न्यायालयाने त्या व्यक्तीला आवाज म्यूट करण्याचे आदेश दिले. यानंतर कामकाज पुढे सुरु झाले. नंतर न्यायालयाने आदेश दिला की, गाणे गाऊन न्यायालयाची कामकाज बाधित करणाऱ्या या व्यक्तीचा शोध घ्यावा आणि त्याच्याविरोधात अवमानना नोटीस जारी करण्याचे आदेश दिले. (After several disruptions, the court asked to identify the person and issue a contempt notice against him for disturbing the proceeding.)

जुहीची मागणी काय होती... 5G टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता,जीव- जिवाणू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणा-या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी तिने संबंधित याचिकेत केली आहे. आमचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अजिबात विरोध नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन अधिक सुसह्य झाले आहे, हेही मान्य  आहे. परंतु 5 Gसारख्या टेक्नॉलॉजीच्या वापराबाबत आपण आजही गोंधळाच्या स्थितीत आहोत. आम्ही स्वत:चा रिसर्च केला तेव्हा आरएफ रेडिएशन आपल्यासाठी अतिशय घातक असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Juhi Chawlaजुही चावला delhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय