शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बँक अधिका-याच्या चुकीनं त्याच्या खात्यावर आले 20 लाख, पैसे उधळल्यानंतर अधिका-यांना आली जाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 08:11 IST

गुजरातमधल्या सुरतमध्ये एकाच्या खात्यात 15 लाख नव्हे, तर 20 लाख रुपये जमा झाले आहेत.

सूरत- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. आजमितीस कोणाच्याही खात्यात अशा प्रकारे पैसे टाकण्यात आलेले नाही. परंतु गुजरातमधल्या सुरतमध्ये एकाच्या खात्यात 15 लाख नव्हे, तर 20 लाख रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे त्या व्यक्तीनं 20 लाख रुपये उधळल्यानंतर बँक अधिका-यांना जाग आली आहे. बँक ऑफ इंडियामधल्या अधिका-याच्या चुकीनं एका व्यक्तीच्या खात्यात 20 लाख जमा झाले. त्याच्या विरोधात आता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी परेश गोधानी याच्या बँक खात्यात बँकेची संगणक प्रणाली अद्ययावत करताना चुकीनं 20 लाख रुपये जमा झाले. परेशनं ही रक्कम खर्च केल्यानं बँक मॅनेजर राजीव माथुर यांनी अदाजन पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.बँक अधिका-याच्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर 2017मध्ये बँक ऑफ इंडियाच्या महल रोड शाखेत बँकेची संगणक प्रणाली अद्ययावत करत असताना गोधानीच्या दोन बँक अकाऊंटमध्ये 20.26 लाख रुपये जमा झाले. अशाच प्रकारे इतरांच्या बँक खात्यातही पैसे जमा झाले होते. बँक अधिका-यांना जेव्हा चुकीची उपरती झाली, त्यावेळी त्यांनी तात्काळ खातेधारकांशी संपर्क साधून पैसे परत करण्याची विनवणी केली. गोधानी सोडल्यास इतर खातेधारकांनी पैसे परत केले. परंतु गोधानीनी काही पैसे परत केले नाहीत. अदाजन पोलिसांच्या माहितीनुसार, गोधानीच्या खात्यात रक्कम जमा होण्यापूर्वी पैसेच नव्हते, पैसे जमा झाल्यानंतर त्याने ते खर्च केले. गोधानीनं डेबिट कार्डाच्या माध्यमातून पैसे खर्च केले. बँक ऑफ इंडियामध्ये गोधानी याचं बचत आणि चालू खाते आहे. या दोन्ही खात्यांमध्ये हे पैसे जमा झाले होते. पोलिसांनी अद्याप आरोपीचा जबाब नोंदवलेला नाही. गोधानीविरोधात योग्य पुरावे मिळाल्यानंतरच त्याला अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. गोधानीविरोधात बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी