शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी कायपण; गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी 'त्याने' केलं तिच्या पुतण्याचंच अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 13:12 IST

२४ तासांमध्ये अपहरण झालेल्या मुलाची सुटका

आधी अपहरण, मग केली जाणारी पैशांची मागणी, अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र तेलंगणातील एका कुटुंबाकडे अपहरण करण्यात आलेल्या मुलाच्या सुटकेसाठी एक अजब मागणी करण्यात आली. मुलगा सुखरुप हवा असेल, तर माझ्या प्रेमात आडवे येऊ नका. माझी गर्लफ्रेंड मला हवी आहे, अशी मागणी अपहरणकर्त्याने कुटुंबाकडे केली. या अपहरणकर्त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याने त्याच्या प्रेयसीसाठी हा संपूर्ण प्रकार केल्याची कबुली दिली आहे. या आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. तेलंगणातील वानपर्ती जिल्ह्यातील कोथाकोटामधून आठ वर्षांच्या चंद्रू नायकचे ७ एप्रिल रोजी शाळेतून अपहरण झाले होते. महबूबनगरमध्ये राहणाऱ्या २३ वर्षांच्या वामसी कृष्णने चंद्रूचे अपहरण केले. अपहरण केलेल्या चंद्रूच्या आत्येसोबत वामसीचे प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या घरी याबद्दलची कुणकुण लागताच त्यांनी वामसीला मारहाण केली आणि पुन्हा जवळपास दिसू नकोस, अशी  धमकीदेखील दिली. त्यामुळे प्रेयसीच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी आणि दुरावलेले प्रेम परत मिळवण्यासाठी चंद्रूचे अपहरण केले. यानंतर वामसीने कोथाकोटा बस स्थानकातून चंद्रूच्या घरी फोन करुन अपहरण झाल्याची माहिती दिली. 'चंद्रू सुखरुप हवा असेल, तर माझ्या गर्लफ्रेंडला माझ्याकडे पाठवा,' अशी धमकीच वामसीने चंद्रूच्या कुटुंबीयांना दिली. वामसीने अनेकदा फोन करुन पीडित कुटुंबाला त्रास दिला. यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी एक विशेष पथक तयार करुन वामसीचा पाठलाग सुरु केला. आरोपी रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर वामसी पुणे स्थानकात उतरताच पोलिसांनी त्याला अटक केली आणि अपहृत मुलाची सुटका केली.  

टॅग्स :Kidnappingअपहरण