शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कात्री-वस्तरा चालवताना ड्रीम टीम बनवली; IPL सामन्यामुळे सलून चालक झाला करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 14:07 IST

सलून चालक झाला कोट्यधीश; कोलकाता वि. चेन्नई सामन्यात लागली लॉटरी

मधुबनी: आयपीएल सामना सुरू होण्याआधी तुमची ड्रीम टीम निवडा आणि करोडो जिंका, अशी जाहिरात आपण अनेकदा निवडतो. आयपीएलच्या सामन्याआधी आपली टीम निवडणाऱ्यांची संख्या कमी नाही. ड्रीम ११ वर टीम लावून दररोज थोडी रक्कम जिंकणारे आपण आसपास पाहतो. मात्र बिहारच्या मधुबनीमध्ये सलून चालवणाऱ्या एकाला ड्रीम ११ नं कोट्यधीश केलं आहे. 

मधुबनीतल्या अंधराठाढीमधल्या ननौर चौकात सलून चालवणाऱ्या अशोक यांना ड्रीम ११ मुळे लॉटरी लागली आहे. रविवारी आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना रंगला. या सामन्याआधी ५० रुपये लावून अशोक यांनी त्यांची ११ जणांची टीम निवडली. त्यांच्या संघानं अक्षरश: कमाल केली. अशोक यांनी निवडलेल्या सर्वच्या सर्व खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. मोदी सरकार सिलिंडरवरील सबसिडी पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत; 'या' व्यक्तींना मिळू शकतो लाभ

मधुबनीत वास्तव्यास असलेल्या अशोक यांना यासंदर्भात कंपनीकडून अधिकृत फोनदेखील आला आहे. अशोक यांनी १ कोटी रुपये जिंकले आहेत. यातील ३० टक्के रक्कम कर म्हणून कापली जाईल आणि अशोक यांना ७० लाख रुपये मिळतील. एका गरीब कुटुंबातून येणाऱ्या अशोक यांना ड्रीम ११ वर इतके पैसे जिंकता येतील, याचा कोणी विचारदेखील केला नव्हता.

अशोक ठाकूर मूळचे मधुबनीतल्या झंझारपूरमधील अररिया संग्रामचे रहिवासी आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय साधारण आहे. ननौर चौकात त्यांचं लहानसं सलून आहे. याच जोरावर ते कुटुंबाचं पोट भरतात. १ कोटी रुपये जिंकल्याचं समजताच अशोक यांना प्रचंड आनंद झाला. याच आनंदाच्या भरात त्यांना रात्रभर झोप लागली नाही. या पैशातून कर्जाची परतफेड करणार असून एक सुंदर घर उभारणार असल्याचं अशोक यांनी सांगितलं. 

टॅग्स :IPLआयपीएल २०२१Kolkata Knight Ridersकोलकाता नाईट रायडर्सChennai Super Kingsचेन्नई सुपर किंग्स