शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

...अन् आतडी बाहेर येऊनही तो ९ किमी चालला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 17:45 IST

तरुणाच्या धैर्यानं सगळे अवाक्; आता प्रकृती स्थिर

वारंगल: अपघातामुळे आतडी बाहेर येऊनही एक तरुण ९ किलोमीटर चालत गेला. तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यात ही अविश्वसनीय घटना घडली. अपघातात गंभीर जखमी होऊनही तब्बल ९ किलोमीटर चालत आलेल्या या तरुणाला पाहून अनेकांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. मात्र तरुणानं दाखवलेल्या धैर्यामुळे त्याचा जीव वाचला. सुनील चौहान असं या तरुणाचं नाव आहे.तीन दिवसांपूर्वी सुनील त्याचा भाऊ प्रवीण आणि अन्य काही जणांसोबत उत्तर प्रदेशच्या बलिया भागातून संघमित्रा एक्स्प्रेसमधून आंध्र प्रदेशच्या नेल्लोरला जायला निघाला होता. मध्यरात्री २ वाजता एक्स्प्रेसनं तेलंगणाच्या हसनपर्थी भागातील उप्पल रेल्वे स्थानक सोडलं. त्यावेळी सुनील लघुशंका करण्यासाठी शौचालयात गेला होता. शौचालयातून बाहेर आल्यावर तो काही वेळ वॉश बेसिनजवळ थांबला. यावेळी डब्याचा दरवाजा उघडा होता. त्या दरवाज्यातून सुनील खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला खाली पडताना कोणीच पाहिलं नसल्यानं एक्स्प्रेस पुढे निघून गेली.वेगात असलेल्या एक्स्प्रेसमधून पडल्यानं सुनील गंभीर जखमी झाला. त्याची आतडी बाहेर आली. मात्र तीव्र वेदना होत असूनही सुनीलनं आतडी आत ढकलली. जखमेवर शर्ट बांधलं आणि अंधारातून रेल्वे रुळांवरुन चालू लागला. आतडी बाहेर येऊ नये म्हणून सुनीलनं जखम दाबून ठेवली आणि त्याच अवस्थेत तो ९ किलोमीटर अंतर कापून हसनपर्थी रेल्वे स्थानकात पोहोचला. स्टेशन मास्टर नवीन पंड्यांनी त्याला रेल्वे रुळांवरुन येताना पाहिलं. त्यांनी सुनीलला तातडीनं वारंगलमधील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सुनीलचा प्रकृती स्थिर आहे.