शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मत दिलं एकाला, व्हीव्हीपॅटवर झळकला भलताच... पुढे जे झालं त्यानं 'तो' हादरलाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 15:21 IST

पश्चिम दिल्लीतील मतदान केंद्रावरील प्रकार

नवी दिल्ली: मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्रणा आणण्यात आली. मात्र यानंतरही त्रुटी कायम असल्याचं समोर आलं आहे. ईव्हीएमवर एकाला मत दिल्यानंतर व्हीव्हीपॅटवर दुसऱ्याच व्यक्तीचं नाव झळकल्याचा प्रकार दिल्लीत घडला. या प्रकरणाची तक्रार न करण्याचा सल्ला मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी दिला. तक्रार केल्यास तुरुंगवास घडेल, असा 'धोक्याचा इशारा'देखील अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातल्या मटियाला मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. याची चौकशी करण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. ईव्हीएमवर एकाला मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटवर दुसऱ्याच व्यक्तीचं नाव दिसल्यानं मिलन गुप्ता यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यांनी याबद्दल कोणतीही तक्रार न करण्याचा सल्ला दिल्याचं गुप्ता यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 'ईव्हीएमवर लाल दिवा पेटला, पण व्हीव्हीपॅटवर वेगळ्याच व्यक्तीचं नाव दिसलं. मी या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी मला नोडल अधिकाऱ्याकडे जाण्यास सांगितलं. त्यांनी मला सेक्शन अधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला दिला. या सगळ्यांनी मला तक्रार करू नका असं सांगितलं,' असं गुप्ता यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तक्रार केल्यास भारतीय दंड विधानाच्या 177व्या कलमांतर्गत अटक करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा अधिकाऱ्यांनी दिल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. कलम 177च्या अंतर्गत अटकेची कारवाई न्यायालयाच्या आदेशाशिवाय करता येत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्याबद्दल मला आश्चर्य वाटलं, असं गुप्ता म्हणाले. दिल्लीतल्या लोकसभेच्या सात जागांवर रविवारी मतदान झालं. दिल्लीत यंदा 60 टक्के मतदान झालं. दिल्लीत यंदा आप, भाजपा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwest-delhi-pcपश्चिम दिल्लीDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019VVPATव्हीव्हीपीएटी