शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
अब्जाधीश असूनही पान मसाल्याचं प्रमोशन? यूट्यूबर ध्रुव राठीचे शाहरुख खानला गंभीर प्रश्न; पैशांचा हिशोब सांगितला
3
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
4
त्वचारोग तज्त्र डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
5
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
6
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
7
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
8
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
9
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
10
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
11
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
12
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
13
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
14
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
15
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
16
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
17
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
18
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
19
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
20
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा

बस हायजॅक करणाऱ्या आरोपींचा आग्र्यात एन्काऊंटर; एक जखमी, दुसरा फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 10:36 IST

बस हायजॅक करणाऱ्या आरोपींसोबत पोलिसांची पहाटे चकमक

आग्रा: बस हायजॅक करणारे आरोपी आणि पोलीस यांच्यात आज पहाटेच्या सुमारास चकमक झाली. फतेहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपासणी सुरू असताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. आरोपींकडून सुरू असलेल्या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. त्यात एका आरोपीच्या पायाला गोळी लागली, तर दुसरा फरार झाला. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या आरोपीचं नाव प्रदीप गुप्ता असं आहे. बस हायजॅक प्रकरणात त्याचं नाव समोर आलं होतं. पोलिसांनी प्रदीप गुप्ताला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे विभागाचं पथक गुप्ताची चौकशी करत आहे. बस हायजॅक प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.काय आहे प्रकरण?काल गुरुग्राममधून एक खासगी बस झाशीच्या मऊरानीपूर, छतरपूर, पन्नामध्ये ३४ प्रवाशांना सोडण्यासाठी निघाली. बस आग्र्याच्या दक्षिण बायपासच्या पुढे जाताच कारमधून आलेल्या काहींनी बसला ओव्हरटेक केला. बस कर्जावर घेण्यात आलेली असून त्याचे हप्ते वेळेवर भरले जात नसल्याचा दावा बसमध्ये शिरलेल्या व्यक्तींनी केला. त्यांनी बसचा चालक आणि कंडक्टरला कारमध्ये बसवलं. कारमधून आलेल्या एकानं बसचा ताबा घेतला. बसमधील प्रवाशांना याची कल्पना नव्हती. त्यांना एका ठिकाणी उतरवून दुसऱ्या गाडीनं झाशीला पाठवण्यात आलं.