शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ममता कुलकर्णी ही आपली पत्नी नाही - विकी गोस्वामी

By admin | Updated: May 2, 2016 19:24 IST

अभिनेत्री ममता कुलकर्णी ही आपली पत्नी नाही; तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी याने केले आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ : अभिनेत्री ममता कुलकर्णी ही आपली पत्नी नाही; तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी याने केले आहे. अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी वॉन्टेड असलेल्या विकीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे धक्कादायक खुलासे केले आहेत.
 
ममता कुलकर्णी विषयी जे लोक उलट सुलट बोलतात त्यांना तिचा स्वभाव कसा आहे हे माहीत नसल्याचे विक्की म्हणाला. ती केवळ एक सेलिब्रिटी असल्यामुळे तिला या प्रकरणात ओढल जात आहे असे विकी म्हणाला. 
                                         
ममता तुझी पत्नी आहे असे विचारले असता विकीने ती आपली पत्नी नाही असे सांगीतले, ती आपली फक्त एक शुभचिंतक आहे. ज्या वेळी मी आडचणीत होतो त्यावेळी ममताने मला मदत केल्याचे विकीने सांगीतले. 
 
विकी गोस्वामीवर अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अनेक गुन्हे आहेत. १९९७ मध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी दुबईत त्याला अटक करण्यात आली होती. तसंच 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षादेखील झाली होती. त्यानंतर विकी गोस्वामी ममता कुलकर्णीसोबत केनियाची राजधानी नैरोबी येथे राहायला गेला. केनियामध्येही त्याच्यावर नवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.