शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ममता, अखिलेश आणि मायावती एकाच मंचावर येणार - लालूप्रसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 20:53 IST

बिहारच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात महाआघाडी बनविणार असल्याचा दावा केला आहे.

रांची, दि. 27 - बिहारच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात महाआघाडी बनविणार असल्याचा दावा केला आहे. या महाआघाडीत कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या समावेश असणार आहे.  लालूप्रसाद यादव यांनी रांचीमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले, केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येतील आणि महाआघाडी होईल. यासाठी 18 पक्ष एकत्र आले आहेत. याचबरोबर लालूप्रसाद यादव म्हणाले की, 27 ऑगस्टमध्ये पाटणामध्ये महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी एकाच मंचावर कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यासह अन्य पक्ष एकत्र येणार आहेत. लालूप्रसाद यादव यांनी यावेळी नितीश कुमार याच्यांवर हल्लाबोल केला. नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वास घात केला असून गरीब, दलित आणि मागास लोकांच्या पाठीवर त्यांनी चाकूने वार केला आहे. तसेच, त्यांनी जनतेला धोका दिला नाही, महा धोका दिल्याचा आरोप सुद्धा यावेळी लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केला. नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून चर्चा होत होती, असेही ते म्हणाले. 

या दिवसभरातील घडामोडीनंतर लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या सर्व आमदारांची संध्याकाळी आपल्या निवासस्थानी बैठक बोलाविली होती.