शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

'बांग्लादेशी नागरिकांसाठी आमचे दरवाजे खुले, त्यांना आश्रय देणार', ममता बॅनर्जींचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 17:54 IST

Bangladesh Violence : आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Mamata Banerjee on Bangladesh : बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रविवारी(दि.21) कोलकाता येथे शहीद दिनाच्या रॅलीनिमित्त व्हिक्टोरिया हाऊससमोर आयोजित सभेला संबोधित करताना ममता यांनी बांगलादेशातील जनतेला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, पश्चिम बंगालचे दरवाजे बांग्लादेशी आश्रितांसाठी नेहमी खुले असतील, असेही त्या म्हणाल्या. 

निर्वासितांबाबतच्या संयुक्त राष्ट्राच्या ठरावाचा संदर्भ देत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "मी बांगलादेशबद्दल फार बोलू शकत नाही, कारण तो वेगळा देश आहे. यावर बोलण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे. पण मी एवढे सांगू शकते की, बांग्लादेशमधील पीडितांनी पश्चिम बंगालचा दरवाजा ठोठावला, तर मी नक्की मदत करेन आणि त्यांना आमच्या राज्यात आश्रय देईन. ज्यांचे नातेवाईक हिंसाचारग्रस्त बांगलादेशात अडकले आहेत, अशा सर्व बंगालमधील रहिवाशांसाठी आम्ही मदत करू. मी सर्वांना आवाहन करते की, बांगलादेशाबाबत कुठल्याही अफवांना बळी पडू नये. फक्त बंगालच भारताचे अस्तित्व सुरक्षित करू शकतो, बंगालशिवाय भारत नाही." 

भाषणादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. भाजपवर आरोप करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "भाजपने लोकांना धमकावून आणि एजन्सीचा गैरवापर करून केंद्रात सरकार स्थापन केले आहे. अनेक लढाया लढल्या गेल्या आहेत आणि अजून बऱ्याच लढायच्या आहेत. मी जिवंत असेपर्यंत लढेन," असेही ममता यावेळी म्हणाल्या.  

बांग्लादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयदरम्यान, अनेक दिवसांच्या हिंसाचारानंतर आज बांग्लादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, आतापासून सरकारी नोकऱ्यांमध्ये 93 टक्के भरती गुणवत्तेच्या आधारे केली जाईल आणि उर्वरित 7 टक्के जागाच राखीव असतील. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBangladeshबांगलादेशwest bengalपश्चिम बंगाल