19 Jan, 19 04:07 PM
19 Jan, 19 03:33 PM
शत्रुघ्न सिन्हांची मोदी सरकारवर जहरी टीका
19 Jan, 19 02:54 PM
रोजगार कुठेय?, खर्गेंचा मोदी सरकारला सवाल
19 Jan, 19 02:08 PM
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. मोदी आणि शहा यांच्या जोडीनं देशाला उद्ध्वस्त केले आहे. आज देशातील युवा पिढीकडे रोजगार नसल्यानं ते हैराण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोजगाराच्या नावाखाली खोटं बोलून त्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकरीदेखील भाजपावर नाराज आहेत, ते आत्महत्या करुन आयुष्य संपवत आहेत. दुसरीकडे, भाजपाचे नेते सोशल मीडियावर महिलांविरोधात अपशब्द वापरतात आणि पंतप्रधान मोदी त्यांनाच फॉलो करताहेत. शिवाय, देशात दलितांवरील अत्याचारदेखील वाढत आहेत. भारत देशामध्ये फूट पाडण्याचं पाकिस्तानचे गेल्या 70 वर्षांपासून स्वप्न होते, जे काम पाकिस्तान करू शकले नाही तेच काम मोदी आणि शहांनी तीन वर्षांत करुन दाखवले आहे.
19 Jan, 19 02:18 PM
लोकशाही वाचवण्यासाठी लढाई - सिन्हा
मोदी सरकार प्रत्येक लोकशाही व्यवस्थेला संपवण्यामागे लागले आहे. मोदींना मुद्दा नका बनवू, असं आवाहनही यावेळेस यशवंत सिन्हा यांनी केले. ही लढाई लोकशाहीला वाचवण्यासाठी आहे. काश्मीर समस्येचं समाधान गोळीनं नाही, संवादाद्वारे होईल. मला पाकिस्तानचे एजंटदेखील म्हटलं गेलं. पण अशी बोलणी करणं म्हणजे देशद्रोह आहे?. माझा एकच उद्देश आहे, एक लढाई बाकी आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढायचं आहे.
19 Jan, 19 02:38 PM
19 Jan, 19 02:38 PM
देशाला वाचवण्यासाठी विरोधक एकत्र - हार्दिक पटेल
पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलनं महामेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले. देशाला वाचवण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. सुभाषचंद्र बोस गोऱ्यांविरोधात लढले होते, आम्ही चोरांविरोधात लढू.
19 Jan, 19 02:37 PM
संविधानच संपवण्याचा प्रयत्न - जिग्नेश मेवाणी
विरोधकांची एकजूट होणं, हा मोठा संदेश आहे. देशात शेतकरी, मजूरवर्ग आणि दलितांचे शोषण होत आहे. संविधानच संपवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
19 Jan, 19 02:08 PM
19 Jan, 19 02:08 PM
19 Jan, 19 02:08 PM
19 Jan, 19 02:07 PM
डीएमके प्रमुख एमके स्टालिन यांनीही मोदी सरकारला टार्गेट केले. त्यांच्या भाषणादरम्यान, 'मोदी हटाओ, देश बचाओ', अशी नारेबाजी सुरू होती.
19 Jan, 19 01:47 PM
19 Jan, 19 01:47 PM
19 Jan, 19 01:46 PM
19 Jan, 19 01:46 PM
हे सर्व मार खाल्लेले पहेलवान - नक्वी
हे सर्व थकलेले आणि मार खाल्लेले पहेलवान आहेत, जे आखाड्यात जाऊन पुन्हा आपलं नशिब आजमावू पाहत आहेत.
19 Jan, 19 01:44 PM
19 Jan, 19 01:43 PM
राफेलसारखा घोटाळा कोणत्याही सरकारमध्ये झाला नाही - अरुण शौरी
राफेल विमान खरेदीवरुन अरूण शौरींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. राफेलसारखा घोटाळा कोणत्याही सरकारमध्ये झाला नाही, असं अरुण शौरींनी म्हटले आहे. अशा पद्धतीनं खोटं बोलणारे सरकार अद्यापपर्यंत सत्तेत आले नव्हते. विरोधक एकत्र येऊनच मोदींना हटवू शकतात. मोदी-शहांवरुन जनतेचा विश्वास उडला आहे.