शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'मी जिंकले नाही तर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल', ममतांना पोटनिवडणुकीत चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 09:46 IST

mamata banerjee : ममता बॅनर्जी यांचे हे विधान पोटनिवडणुकीसंदर्भातील त्यांच्या तणावाची अभिव्यक्ती असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बुधवारी भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी  (Mamata Banerjee)ही पोटनिवडणूक जिंकले नाही तर दुसरे कोणीतरी मुख्यमंत्री होईल, असे एक महत्वाचे विधान केले. ममता बॅनर्जी येथील जाहीर सभेत म्हणाल्या, 'मी जिंकले नाही तर दुसरा मुख्यमंत्री होईल. मला मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवण्यासाठी तुमचे मत द्या. प्रत्येक मत माझ्यासाठी मौल्यवान आहे, ते वाया घालवू नका.'

'...तर माझा पराभव होईल'पोटनिवडणूकीच्या प्रचार रॅलीदरम्यान स्वत: ला लोकांचा तारणहार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. त्या म्हणाल्या, "मला नंदीग्राममधून निवडणूक लढवण्यास सांगितले गेले, जिथे मी शेतकरी आंदोलनासाठी लढले, पण माझा तिथे कसा पराभव झाला, हे आपणा सर्वांना माहित आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. तुम्हा सर्वांना लवकरच कळेल की, तेथे माझ्यासोबत काय झाले. पण आता मी इथे आहे .. कदाचित हे भाग्य असेल. मी तुम्हाला सोडू शकत नाही. प्रत्येक मत मौल्यवान आहे. त्यामुळे मी जिंकेन असाच विचार करून तुमचे मत वाया घालवू नका. जर तुम्ही मत दिले नाही तर माझा पराभव होईल." 

'देशात तालिबानी राजवट स्वीकारणार नाही'केंद्रातील भाजपा सरकारविरोधात आपला निषेध व्यक्त करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी मोदी-शाह यांना दादा (भाऊ) म्हणू शकते,  हा शिष्टाचार आहे. मात्र मी देशात तालिबानी राजवट स्वीकारणार नाही. मी देश तोडू देणार नाही. मी राज्याचे तुकडे होऊ देणार नाही. मी सामान्य लोकांमध्ये फूट पडू देणार नाही. ते निरंकुश पद्धतीने सरकार चालवत आहेत. आम्हाला रॅली करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी अचानक त्रिपुरामध्ये कलम 144 लागू केले आहे. हे सर्व एका लोकशाही देशात चालू राहू शकत नाही.

'मताचा प्रभाव दिल्लीत दिसेल'याचबरोबर, आपल्या रॅलीमध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'गरज पडल्यास त्रिपुरा, आसाम, गोवा आणि उत्तर प्रदेशमध्येही असेच खेळ खेळले जातील. तुमचे मत दंगलखोरांना रोखण्यास मदत करेल. जर तुम्ही इथे मतदान केले तर तुम्हाला दिल्लीत याचा प्रभाव दिसेल. या तालिबानीवादाशी लढण्यासाठी मी कोणत्याही क्षेत्रात जाईन."

ममतांना निकालाची चिंतादरम्यान, ममता बॅनर्जी यांचे हे विधान पोटनिवडणुकीसंदर्भातील त्यांच्या तणावाची अभिव्यक्ती असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. एक राजकीय विश्लेषक म्हणाले, “त्या यापूर्वी कधीही या स्थितीत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांना निवडणुकीच्या निकालाची चिंता वाटते. भवानीपूरमधील मागील निवडणुकांची आकडेवारी देखील दर्शवते की, त्या आपल्या विजयावरून पूर्णपणे समाधानी नाहीत."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक