शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दीदींचा जय हिंदचा नारा; भाजपा-TMC वादानंतर बदलला स्वतःच्या ट्विटर अन् फेसबुकचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 13:36 IST

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

कोलकाताः पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान जय श्री रामच्या घोषणा देणाऱ्यांवर भडकणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि टीएमसी नेत्यांनी स्वतःच्या सोशल मीडियावरच्या ट्विटर आणि फेसबुकवरचा (डिस्प्ले प्रोफाइल)डीपी बदलला आहे. टीएमसीच्या बऱ्याच नेत्यांनी आता डीपीतून 'जय हिंद, जय बांग्ला'चा नारा दिला आहे.डीपीमध्ये जय हिंद जय बांग्लाच्या घोषणेसह अनेक महापुरुषांचा फोटोही पाहायला मिळत आहे. डीपीमध्ये महात्मा गांधी, क्रांतिकारी नेते सुभाषचंद्र बोस, भगत सिंह, मातंगिनी हाजरा, नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर, कवी काजी नजरूल इस्लाम, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन राय, धार्मिक आणि सामाजिक विचारक स्वामी विवेकानंद आणि भारतीय संविधानाचे जनक बी. आर. आंबेडकर यांचे फोटो लावण्यात आले आहेत. निवडणुकीच्या निकालापूर्वी अमित शाहांच्या पश्चिम बंगालमध्ये झालेल्या रॅलीदरम्यान टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यावेळी झालेल्या हिंसेमध्ये विद्यासागर यांची मूर्ती तोडण्यात आली होती. त्यानंतरही ममतांनी डीपीमध्ये विद्यासागर यांचा फोटो लावला होता. आता फेसबुक पोस्टमध्ये ममतांनी लिहिलं आहे की, जय सिया राम, जय राम जी की, राम नाम सत्य है या धार्मिक आणि सामाजिक धारणा आहेत. आम्ही या भावनांचा सन्मान करतो. परंतु भाजपा धर्माच्या नावाखाली राजकारण करू पाहत असल्याचा त्यांनी आरोपही केला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल