पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारची रोजगार हमी योजना 'कर्मश्री'चे नाव आता महात्मा गांधींच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने मनरेगा (MGNREGA) योजनेतून महात्मा गांधींचे नाव हटवल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही गोषणा केली. तसेच, केंद्राचे हे पाऊल अत्यंत 'लाजीरवाणे' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "जर केंद्र सरकार राष्ट्रपित्याला सन्मान देऊ शकत नसेल, तर आम्ही तो सन्मान देऊ." खरे तर, केंद्र सरकारने नुकतेच मनरेगाचे नाव बदलून 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) बिल' म्हणजेच VB G RAM G असे करण्यासाठी संसदेत विधेयक सादर केले होते, जे गुरुवारी लोकसभेत मंजूर झाले आहे. केंद्राच्या या निर्णयावरून, विरोधक आक्रमक झाले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट राज्याच्या योजनेचे नावच गांधीजींच्या नावे करून केंद्राला प्रतिउत्तर दिले आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रगतीचा पाढा वाचताना विरोधकांवर निशाणा साधला. बंगाल हे आज एक प्रमुख लॉजिस्टिक्स हब बनले असून ते दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व भारत आणि ईशान्येकडील राज्यांचे प्रवेशद्वार ठरले आहे. बंगालला झारखंड, बिहार आणि ओडिशा या राज्यांच्या सीमांनी वेढलेले आहे.
ममता म्हणाल्या, बंगाल शांतताप्रिय राज्य आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी, खोट्या आहेत. हे सर्व, केवळ राज्याची प्रतिमा मलीन करण्यच्या उद्देशाने केले जात आहे. काही खोट्या बातम्या तथाकथित सोशल मीडियावरून येतात, जे व्हिडिओ पोस्ट करतात किंवा बंगालला बदनाम करण्यासाठी चुकीची माहिती पसरवतात. पण मी कुणालाही आव्हान देते, ते बंगालचे नुकसान करू शकत नाहीत.
Web Summary : West Bengal CM Mamata Banerjee renamed the state's job scheme 'Karmashree' after Mahatma Gandhi, criticizing the central government's move to remove Gandhi's name from MGNREGA. She accused the center of disrespecting the father of the nation, while highlighting Bengal's progress.
Web Summary : पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने मनरेगा से गांधी का नाम हटाने के केंद्र के कदम की आलोचना करते हुए राज्य की नौकरी योजना 'कर्मश्री' का नाम बदलकर महात्मा गांधी के नाम पर रख दिया। उन्होंने केंद्र पर राष्ट्रपिता का अनादर करने का आरोप लगाया, और बंगाल की प्रगति पर प्रकाश डाला।