शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या आरोपींवर मोदींची कृपा!

By admin | Updated: May 16, 2016 04:44 IST

२००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या ताज्या आरोपपत्राने भारताची सचोटी व दहशतवादाविरुद्ध लढा देण्यातील प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह लावले आहे

नवी दिल्ली : २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या ताज्या आरोपपत्राने भारताची सचोटी व दहशतवादाविरुद्ध लढा देण्यातील प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह लावले आहे, असे सांगून या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात आली पाहिजे, अशी जोरदार मागणी काँग्रेसने केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालेगाव प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करण्याचा आदेश देऊन आपली संविधानाची घेतलेली शपथ सार्थक ठरवावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत केले. ‘एनआयए’ ही आता ‘नमो तपासी संस्था’ (नमो इन्व्हेस्टीगेशन एजन्सी) बनली आहे, असा स्पष्ट आरोप करून शर्मा म्हणाले, मुंबई एटीएसचे प्रमुख (दिवंगत) हेमंत करकरे यांनी केलेला सखोल तपास मोडीत काढण्याच्या उद्देशानेच एनआयएने हे आरोपपत्र दाखल केले आहे, असे दिसते. एटीएसने याआधी नोंदविलेले सर्व जाबजबाब आता निष्प्रभ ठरविण्यासाठीच एनआयएने आरोपींवरील ‘मकोका’चे आरोप मागे घेतल्याचे स्पष्ट होते.एनआयएने साध्वी प्रज्ञासिंहसह सहा आरोपींवरील ‘मकोका’ रद्द केला होता. एनआयएने अचानक ही भूमिका का घेतली, याचा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत तपास करण्यात आला पाहिजे, अशी मागणी करून शर्मा म्हणाले, या घडामोडीमुळे भारताची अखंडता आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या कटिबद्धतेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. करकरेंचे बलिदान व्यर्थ घालविण्याच्या उद्देशाने एनआयएने हा नवा पवित्रा घेतला आहे काय? आता मोदींनीच यात हस्तक्षेप केला पाहिजे. ।हा तर शहिदांचा अवमानमालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना क्लीन चिट देण्यामागे पंतप्रधान मोदींचाच हात आहे. हा एटीएस प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांच्यासारख्या शहिदांचा अवमान आहे.मोदी सरकार तपासात हस्तक्षेप करून एनआयएवर दबाव टाकत आहे. त्यामुळेच या प्रकरणातील आरोपींविरुद्धचा मकोका हटवून त्यांना क्लीन चिट दिली जात आहे. यामुळे केवळ चुकीचा संदेशच जात नाही, तर भारताची विश्वसनीयताही कमी होत आहे. या गंभीर मुद्द्यावर मोदींनी मौन सोडावे, असेही शर्मा म्हणाले.मालेगाव खटल्यात झालेल्या घडामोडींवर आपण बोलणार नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान आहे. मात्र, या प्रकरणात राज्य पोलीस विधिज्ञांच्या सल्ल्यानुसार कारवाई करतील.- प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र