शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरण; कर्नल पुरोहितच्या याचिकेवरील सुनावणी ७ ऑगस्टपर्यंत तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 06:25 IST

पुरोहितच्या याचिकेनुसार, तो लष्करात असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी परवानगी घेण्याची आवश्यकता आहे.

मुंबई : बेकायदा हालचाली (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत कारवाई करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली परवानगी अवैध आहे. त्यामुळे आपल्यावर यूएपीएअंतर्गत केलेली कारवाई रद्द करण्यात यावी, यासाठी मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने केलेल्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने ७ आॅगस्टपर्यंत तहकूब केली. गुरुवारच्या सुनावणीत पुरोहितच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्या. इंद्रजीत महंती व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे युक्तिवाद केला.

पुरोहितला कोणीतरी यामध्ये नाहक गोवले आहे. त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. ते निर्दोष असल्याचे मी सिद्ध करेन. त्यांची सन्मानाने या केसमधून निर्दोष म्हणून सुटका केली पाहिजे, असे रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले. पुरोहित भारतीय लष्करात काम करीत आहेत. ते कधीच अशा दहशतवादी कृत्यात सहभागी नव्हते. हिंदू दहशतवादी संघटनेशी त्यांचा कधीच संपर्क नव्हता, असेही रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले. पुरोहितवर यूएपीए, स्फोटके कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या कायद्यांतर्गत पुरोहित व अन्य आरोपींवर विशेष न्यायालयात खटला सुरू आहे.

पुरोहितच्या याचिकेनुसार, तो लष्करात असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. १७ जानेवारी २००९ रोजी गृहविभागाच्या अतिरिक्त सचिवांनी त्याच्यावर कारवाई करण्यास दिलेली परवानगी बेकायदेशीर आहे. यूएपीएअंतर्गत कारवाई करण्यास परवानगी देण्यापूर्वी विशेष प्राधिकरण नेमणे आवश्यक आहे आणि ही समितीच आरोपीवर कारवाई करायची की नाही, याबाबत निर्णय घेऊ शकते. मात्र, पुरोहितवर कारवाई करण्यासाठी २००९ मध्ये परवानगी दिली आणि विशेष प्राधिकरण आॅक्टोबर २०१० मध्ये नियुक्त केले. त्यामुळे त्याच्यावर कारवाईसाठी दिलेली परवानगी बेकायदा असून यूएपीए अंतर्गत खटला भरू शकत नाही. पुरोहितच्या याचिकेवर एनआयएने आक्षेप घेतला. न्यायालयाने पुढील सुनावणी ७ आॅगस्ट रोजी ठेवली. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक लोक जखमी झाले.खटला इन कॅमेरा चालवण्यासंदर्भात आज सुनावणीमालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीदरम्यान एनआयएने गुरुवारी विशेष एनआयए न्यायालयात हा खटला इन-कॅमेरा चालविण्यासाठी अर्ज केला. हा खटला इन-कॅमेरा चालविण्यात आला तर प्रसारमाध्यमांना या खटल्याला उपस्थित राहता येणार नाही. न्या. व्ही. ए. पडसाळकर यांनी या अर्जावर शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवMalegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालय