मालेवाडा...
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
मनरेगाची मजुरी केवळ ५४ रुपये
मालेवाडा...
मनरेगाची मजुरी केवळ ५४ रुपयेमालेवाडा : मनरेगा योजनेत नियमाप्रमाणे मजुरांना १६८ रुपये मजुरी दिली जाते. असे असताना नजीकच्या मांगरूड येथे मनरेगा योजनेंतर्गत कामातील मजुरांना एका दिवसाची केवळ ५४ रुपये मजुरी दिल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. याबाबत मजुरांनी खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. भिवापूर तालुक्यातील मांगरूड येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मांगरूड-परसोडी या रस्त्याचे मातीकाम सुरू करण्यात आले. या कामात डिसेंबर महिन्यात काम केलेल्या मजुरांना केवळ ५४ रुपये व ८९ रुपये प्रति दिवस याप्रमाणे मजुरी देण्यात आली. याबाबत मजुरांनी सांगितले की, ११ ते २४ डिसेंबरदरम्यान आम्ही नियमित काम केले. ग्रामसेवक लिंगायत यांनी मजुरांना कामाचे मोजमाप करून दिले होते. त्यानुसार मजुरांनी काम पूर्ण केल्यानंतरही अत्यल्प मजुरी देण्यात आली, अशी माहिती मजुरांनी दिली. या संदर्भात मजुरांनी भिवापूर पंचायत समितीकडे धाव घेतली असून सभापती कुंदा कंगाले यांच्याकडे निवेदन सादर केले. सदर मातीकामाचे नव्याने मोजमाप करून मजुरांना नियमाप्रमाणे मजुरी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)