शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या नाकावर टिच्चून मलबार नौदल सरावास सुरुवात

By admin | Updated: July 10, 2017 19:56 IST

एकीकडे सीमेवरील तणावामुळे चीनशी ताणलेले संबंध आणि चीनकडून घेण्यात येत असलेला तीव्र आक्षेप यांना डावलून भारत, अमेरिका आणि जपान

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० -  एकीकडे सीमेवरील तणावामुळे चीनशी ताणलेले संबंध आणि चीनकडून घेण्यात येत असलेला तीव्र आक्षेप यांना डावलून भारत, अमेरिका आणि जपान यांच्या नौदलांमध्या मलबार सरावाला प्रारंभ झाला आहे. तिन्ही देशांमधील सैनिकी संबंधांना दृढ करणे हा या सरावाचा उद्देश आहे. या सरावाचे हे २१ वे पर्व असून, हा संयुक्त नाविक सराव १७ जुलैपर्यंत चालणार आहे. 
भारतीय नौदलाच्या पूर्वैकडील नाविक आघाडीचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चिफ एच.सी.एस. बिस्ट यांनी बंगालच्या उपसागरामध्ये हा सराव सुरू झाल्याची घोषणा केली. ते म्हणाले, "समान आव्हाने आणि संकटांचा सामना करणे हे या सरावाचे उद्दीष्ट आहे." मात्र भारतीय समुद्रामध्ये चीनी पाणबुड्यांच्या हालचालींबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले. 
  दरम्यान भारत, अमेरिका आणि जपान यांच्यातील नाविक सरावाबाबत चीनची भूमिका काय असेल या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या स्ट्राइक ग्रुप ११ चे कमांडर रियर अॅडमिरल विल्यम डी. ब्रायन म्हणाले, "या सरावातून एकच संदेश जातो तो म्हणजे आम्ही सोबत राहून चांगले काम करू शकतो. तसेच संभाव्य संकटांना पूर्णपणे संपुष्टात आणू शकतो."

 अधिक वाचाचीनच्या धमकीला ठेंगा, भारतीय लष्कराने डोकालममध्ये गाडले तंबू चीनच्या धमक्या आणखी वाढल्याभूतान फार आनंदी देश नाही, चिनी मीडियाचा कांगावाभूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केले नाही, चीनचा दावा

मलबार येथे सुरू असलेल्या या तीन देशांच्या सरावामध्ये १६ युद्धनौका,  ९५ विमाने आणि दोन पाणबुड्यांनी सहभाग घेतला आहे. या सरावात जपानच्या मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्सने सलग चौथ्या वर्षी सहभाग घेतला आहे. १९९२ पासून  भारत आणि अमेरिका बंगालच्या उपसागरात दरवर्षी नाविक सरावाचे आयोजन करत आहे.