रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
महाराष्ट्रात काँग्रेसचा झालेला दारुण पराभव आमच्या जिव्हारी लागला असून, विधानसभा निवडणूक जिंकायची असेल, तर मोठे संघटनात्मक व प्रशासकीय बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही, असा सूर काँग्रेसच्या पराभूत लोकसभा उमेदवारांनी, राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यांनी, कार्यकारिणीतील पदाधिका:यांनी ए.के. अॅन्थनी समितीपुढे शनिवारी आळवला.
या समितीने मुख्यमंत्री चव्हाण, ठाकरेंसह शिवाजीराव देशमुख, खा. अशोक चव्हाण, नारायण राणो, गुरुदास कामत, अविनाश पांडे, मुकुल वासनिक, प्रिया दत्त, संजय निरुपम, जनार्दन चांदूरकर, शिवाजीराव मोघे, खा. राजीव सातव, यवक काँग्रेसचे अघ्यक्ष विश्वजीत कदम, एनयूआयचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पक्षाच्या राज्यातील 21 महत्त्वाच्या पदाधिका:यांना बोलविले होते. त्यातील सात जण आले नसल्याचे सूत्रंनी सांगितले. आठवडय़ाप्रारंभीच दिल्लीत येऊन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपले मत अॅन्थनी यांना सांगितल्याने ते निमंत्रित असून, आज आलेले नाहीत. प्रदेशातील दारुण पराभवाची कारणमीमांसा 15, गुरुद्वारा रखाबगंज मार्गावरील या काँग्रेसच्या वॉररूममध्ये अॅन्थनी समितीने या सर्वाशी वन टू वन बोलून केली.
दुपारी चार ते रात्री पावणोआठर्पयत ही चर्चा सुरू होती. प्रत्येकाला स्वतंत्रपणो समितीपुढे बोलविण्यात येत असल्याने कोण काय बोलले याचा अंदाज कोणालाच लागत नव्हता. माजी मुख्यमंत्री व उद्योगमंत्री नारायण राणो, माजी सरचिटणीस विलास मुत्तेमवार आणि सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपल्या भावना अत्यंत कडक शब्दांत मांडल्याचे सूत्रंनी सांगितले. अॅन्थनी यांनी सा:यांचे म्हणणो ऐकून घेतले, तर मुकुल वासनिक, अविनाश पांडे व सरचिटणीस रामचंद्र खुटिया यांनी ती मते लिहून घेतली.
समितीचे कामकाज सुरू झाल्यावर 1क् मिनिटांनी महाराष्ट्राचे पक्षप्रभारी मोहनप्रकाश वॉररूममधून बाहेर पडले. ते न बोलताच निघून गेले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्या 2क् मिनिटांत आपली भूमिका मांडून तिथून बाहेर पडले. बैठक निम्म्यावर आली असताना गुरुदास कामत यांनी तिथे प्रवेश केला. मात्र त्यांनी महाराष्ट्रातील स्थितीवर बोलणो टाळले.
केंद्रातील आघाडी सरकारच्या 1क् वर्षातील महत्त्वाच्या योजनांची नीट परिणामकारक अंमलबजावणी राज्य सरकारने केली नाही. राजीव गांधी जीवनदायी योजना, रमाई आवास योजना यांचा लाभ गरिबांना झाला, पण ते सांगण्यास राज्यातील नेते अपयशी ठरले. मुंबईतील मेट्रो, तेथील नवे रस्ते, उड्डाणपूल आघाडी सरकारची देण आहे, हे पटवून देण्यास काँग्रेस कमी पडली, असे मत अनेकांनी मांडले.
सरकार व संघटनेत दुरावा!
सरकार व संघटनेत कायम दुरावा आहे. समन्वय नसल्याने राज्यात सत्तेत असलेल्या दोन पक्षांमध्ये उघड होणा:या भांडणाचा विरोधकांना लाभ झाला. मुख्यमंत्री बदलणार व प्रदेशाध्यक्षांना काढणार या बातम्यांवर काँग्रेसकडून कोणताच अधिकृत खुलासा कधीच केला जात नाही. पराभव झाल्यावर आपण चर्चा करत आहोत, त्यापेक्षा तो होऊ नये म्हणून आता विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रूपरेषा कशी आखली पाहिजे, ते लगेच ठरविले जावे, असे काहींनी स्पष्टपणो सांगितले. अनेकांनी आपल्या पराभवाची कारणमीमांसा करताना जबाबदार असलेल्यांची नावेही घेतल्याची माहिती सूत्रंनी दिली.
अॅन्थनी समितीचा अहवाल आल्यानंतर टाइमफ्रेम ठरवून महाराष्ट्रातील निवडणूक कशी जिंकायची त्याची रूपरेषा निश्चित करून, संघटना व प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून कार्यवाहीला तत्काळ वेग दिला पाहिजे. वेळ फार कमी असल्याने जलद गतीने राजकीय व प्रशासकीय निर्णय घेतले तर राज्यात पक्षाला आणखी मजबुती येईल.
- खा. अशोक चव्हाण
राज्यात काँग्रेस अस्थिर झाल्यागत आहे. रोज मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांची खुर्ची जाणार म्हणून चर्चा रंगते. कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. एकदा काय तो यांच्याबाबत निर्णय घ्या आणि संभ्रम संपवा. राज्यात सरकार आहे की नाही, हा प्रश्न विचारला जातो. विधानसभेसाठी उमेदवार लवकर जाहीर झाले तरच तयारी करता येईल.
- शिवाजीराव मोघे,
सामाजिक न्याय मंत्री
वन टू वन चर्चा झाल्याने कोणी काय सांगितले, ते गुलदस्त्यात आहे. आपापल्या पद्धतीने सा:यांनी सांगितले. तक्रारीही केल्या असतील. पराभवाची कारणमीमांसा तक्रारी, सूचना करूनच पूर्ण होईल. त्यासाठीच या सर्वाना समितीने पाचारण केले होते. विचारमंथनातून यश गवसेल, असा विश्वास आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या आहेत. आम्ही रीसोडची विधानसभा पोटनिवडणूक त्याच काळात जिंकलो. त्यासाठी रूपरेषा आखत आहोत. - माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष