शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयस्पर्शी... शहीद वडिलांच्या युनिफॉर्मवर त्या चिमुरडीनं लावलं शौर्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 15:46 IST

त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले जात असताना स्थानिक लोकांनी दगडफेक करत लष्कराची गाडी रोखून धरली.

भिवानी: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर सतीश दहिया यांच्या चिमुकलीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी मेजर सतीश दहिया यांना त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकरवी मरणोत्तर शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. मेजर दहिया यांच्या आई व पत्नीने हा पुरस्कार स्वीकारला होता. हा पुरस्कार घरी घेऊन आल्यानंतर मेजर दहिया यांची मुलगी प्रियांशा हिने शौर्य पदक आपल्या वडिलांच्या गणवेशावर लावले. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत 900 जणांना हा फोटो रिट्विट केला आहे तर 2500 हून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. फेसबुकवरही अनेक जणांकडून हा फोटो शेअर केला जात आहे. शहीद मेजर सतीश दहिया यांचे कुटुंब भिवानीनजीक असणाऱ्या बनिहाडी गावात वास्तव्याला आहे. मेजर सतीश दहिया यांना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीच्यावेळी तीन गोळ्या लागल्या होत्या. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले होते. मात्र, तरीदेखील त्यांनी मागे न हटता दहशतवाद्यांशी मुकाबला केला. यादरम्यान त्यांच्या छातीत आणखी दोन गोळ्या लागल्या. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले जात असताना स्थानिक लोकांनी दगडफेक करत लष्कराची गाडी रोखून धरली. त्यामुळे रुग्णालयात पोहोचेपर्यंत मेजर दहिया यांच्या शरीरातून मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाला. परिणामी त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर