शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उरी सेक्टरमध्ये जवानाकडून मेजरची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 11:39 IST

जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एका जवावाने त्याच सेक्टरमधील मेजरची गोळ्या घालून हत्या केली असल्याची माहिती समोर येते आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18- जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एका जवावाने त्याच सेक्टरमधील मेजरची गोळ्या घालून हत्या केली असल्याची माहिती समोर येते आहे. मंगळवारी ही घटना घडली. मोबाइल वापरण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादावरून झालेल्या गोळीबारात मेजरला गोळी लागल्याचं वृत्त आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही 8 राष्ट्रीय रायफल दलात तैनात होते. या घटनेची माहिती मिळतात सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या मेजरचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
 या घटनेत मृत्यू झालेल्या मेजरचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. शेखर थापा असं मृत्यू झालेल्या मेजरचं नाव आहे. 
आणखी वाचा
 

स्फोटकाचे नमुने आग्राला पाठवलेच नाहीत, उत्तर प्रदेश सरकारचं स्पष्टीकरण

स्मृती इराणी यांना माहिती व प्रसारण मंत्रिपद

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्युटीवर असताना जवानाला मोबाइल फोन वापरायला मनाई करण्यात आली होती. मेजरच्या या निर्णयामुळे नाराज असलेल्या जवानाने गोळी चालविल्याचं कळतं आहे. आरोपी जवान जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये तैनात आहे. गोळी लागल्याने मेजर थापा यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेतील आरोपी जवावाने मेजरला मागून एके-47 मधून पाच गोळ्या झाडल्या. दरम्यान लष्कराने या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मेजर शेखर थापा 8 राष्ट्रीय रायफल दलात तैनात होते. ज्या ठिकाणी मेजर ड्युटीवर तैनात होते ती जागा एलओसीपासून खूप जवळ आहे. या घटनेला लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून चौकशीचे आदेश दिले आहेत. ड्युटीवर असलेला जवान मोबाइल फोनचा वापर करत होता. त्याला बघून मेजर शेखर थापा यांनी त्या जवानाला हटकलं तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं होतं. या मुद्द्यावरून दोघांमध्ये धक्काबुक्की झाली होती. या धक्काबुक्कीत जवानाचा फोट तुटला. त्यामुळे दोघांमध्ये सुरू झालेला वाद टोकाला गेला होता. या कारणावरून त्या जवानाने मेजर थापा यांना गोळ्या मारल्या.

दरम्यान, या प्रकरणी लष्कराकडून कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून मंगळवारी संध्याकाळपर्यंत लष्कर अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.