शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

VIDEO - BSF चा POK मध्ये मोठा हल्ला, 10 पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 17:45 IST

जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्करानेही लगेचच सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देसांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल आरपी हजरा शहीद झाले होते. बीएसएफच्या कारवाईत 15 पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले असून पाकिस्तानच्या तीन चौक्या उद्धवस्त करण्यात आल्याचे वृत्त न्यूज 18 वृत्तवाहिनीने दिले आहे. 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्करानेही लगेचच सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या बॉर्डर अॅक्शन फोर्सने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये मोठा हल्ला केला. बीएसएफच्या कारवाईत 10 पेक्षा जास्त पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले असून पाकिस्तानच्या तीन चौक्या उद्धवस्त करण्यात आल्याचे वृत्त न्यूज 18 वृत्तवाहिनीने दिले आहे. 

काल सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल आरपी हजरा शहीद झाले होते. भारतीय लष्कराने 24 तासांच्या आता पाकिस्तानला जबर दणका दिला आहे. चार दिवसांपूर्वी पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता  रक्तपाताने झाली. 

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद झाले, तर आणखी तिघे जखमी झाले. 

 

लष्कराच्या घातक कमांडोंनी POK मध्ये घुसून अशी केली कारवाईआठवडयाभरापूर्वी  भारतीय लष्कराच्या घातक कमांडोंनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या  रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी भागात घुसून कारवाई केली होती. पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने केलेल्या हल्ल्यात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाले होते. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली होती.  पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भागात जाऊन कारवाई करणे इतके सोपे नव्हते पण घातक कमांडोंनी या मोहिमेतून आपले शौर्य, साहस आणि जिगर जगाला दाखवून दिली.

अशी केली कारवाई 

सर्जिकल स्ट्राईकसारखे हे ऑपरेशन वाटत असले तरी भारतीय लष्कराने याला सिलेक्टीव्ह टार्गेटींग म्हटले आहे. म्हणजेच  मर्यादीत स्वरुपाची ही लष्करी कारवाई होती. इनफॅन्ट्री बटालियनचे पाच ते सहा घातक कमांडो पाकव्याप्त काश्मीरमध्ये 250 ते 300 मीटर आतपर्यंत घुसले. तिथे जाऊन या कमांडोंनी आईडी स्फोटके पेरून ठेवली होती. पाकिस्तानी लष्कराचे गस्तीवर असलेले 59 बलुच युनिट तिथे पोहोचताच त्यांना स्फोटाचा पहिला हादरा बसला. त्याचवेळी तिथे ब-याचवेळापासून प्रतिक्षा करत असलेल्या कमांडोंनी बेछूट गोळीबार सुरु केला. या कारवाईत आपले तीन सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानने मान्य केले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले. 

स्थानिक कमांडरने या ऑपरेशनची आखणी केली आणि ब्रिगेड कमांडरने मंजुरी दिली. त्यामुळे या कारवाईची सर्जिकल स्ट्राईकशी तुलना करता येणार नाही. सर्जिकल स्ट्राईक उच्चस्तरावर आखण्यात आलेली मोहिम होती. भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडोंनी पीओकेमध्ये 2 किलोमीटरपर्यंत आतमध्ये घुसून पीर पंजाल भागातील चार दहशतवादी तळ आणि त्यांच्याजवळ असलेल्या दोन पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्या होत्या. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकशी या ऑपरेशनची तुलना होऊ शकत नाही असे लष्करी अधिका-याने सांगितले.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान