शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

ऐक्य जपण्यास ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’

By admin | Updated: November 30, 2015 03:18 IST

वाढत्या असहिष्णुतेवर वाद-विवाद झडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेचा प्रस्ताव ठेवला. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमात

नवी दिल्ली : वाढत्या असहिष्णुतेवर वाद-विवाद झडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेचा प्रस्ताव ठेवला. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमात, त्यांनी देशाचे ऐक्य आणि सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी सूचना मागवल्या आहेत. ‘अंतर्गत दक्षता हेच स्वातंत्र्याचे बक्षीस आहे. देशाच्या ऐक्याची संस्कृती कायम राहायला हवी. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती कार्यक्रमात मी याविषयी बोललो होतो. या संकल्पनेला योजनेचा आकार दिला जावा, असे मला वाटते. या योजनेची रचना कशी असावी, लोगो आणि जनसहभाग कसा वाढवावा, यावर ट८ॠङ्म५.ूङ्मे या पोर्टलवर सूचना- शिफारशी सादर कराव्या. तुमची सर्जनशीलता कामी आणून ऐक्य आणि सलोख्याचा मंत्र देत, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही योजना साकारू या,’ असे आवाहन मोदींनी केले. ही योजना कशी असावी, त्यात कोणते कार्यक्रम समाविष्ट असावेत, सरकार, समाज आणि नागरी समुदायाने काय करावे, यावर ‘ही प्रतिष्ठित अशी तहहयात चालणारी योजना असावी. त्यात प्रत्येक जण सहजरीत्या जोडला जावा,’ असे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करीत, सरकार काहीही करीत नसल्याचे आरोप होत असताना, मोदींनी केलेल्या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘अवयवदानामुळे कुणाला नवे आयुष्य लाभू शकते. एखाद्याचे मौल्यवान आयुष्य वाचविता येते. ३ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक अशक्तता दिवस’ म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्राकडे अवयवदान करू इच्छिणाऱ्यांच्या फोनकॉल्सची संख्या सात पटीने वाढली आहे. अवयवदानामुळे एखाद्याला नवे जीवन लाभत असल्यामुळे, सर्वोत्तम दान दुसरे कोणते असू शकणार?’ असे मोदी म्हणाले. २७ नोव्हेंबर रोजी भारतात अवयवदान दिवस पाळण्यात आला. या क्षेत्रात आणखी जागरूकता वाढेल, असा मला विश्वास आहे. काश्मीरच्या जावेद अहमद यांना अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या, पण ते वाचले. दहशतवादाची जखम त्यांची उमेद घालवू शकली नाही. त्यांनी जीवन समाजसेवेला समर्पित केले. शरीर साथ देत नसतानाही, ते गेल्या २० वर्षांपासून मुलांना शिकविण्याच्या कामात मग्न झाले आहेत,’ असा उल्लेखही त्यांनी केला.