सुरेश भटेवरा नवी दिल्ली : गुजरातमध्ये हिंदुत्वाला पर्याय नाही हे लक्षात येताच यंदा निवडणुकीत राजकारणाचेच हिंदूकरण झाले आहे. पूर्वी भाजपाचे अनुयायी मंदिरांमध्ये जायचे. आता राहुल गांधीही द्वारका, चामुंडा मंदिरांमध्ये जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही देवळांची परिक्रमा करीत आहेत. तथापि गुजरातमध्ये मूळ प्रश्न आहे वाढणाºया बेरोजगारीचा, शेतकºयांच्या समस्यांचा आणि बंद कारखाने सुरू करण्याचा. या समस्यांचे निराकरण होत नाही, तोपर्यंत गुजराती जनतेची मने जिंकता येणार नाहीत, असे परखड उद्गार विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवर दिलेल्या मुलाखतीत काढले.भारताचा जीडीपी वाढतोय, असे म्हणतात. मात्र त्या प्रमाणात रोजगार निर्माण होताना दिसत नाहीत. राज्यात २२ हजार कोटींचा टाटा नॅनोचा कारखाना आला आणि रोजगार मिळाले अवघ्या २२00 लोकांना. अशी जॉबलेस ग्रोथ काय कामाची? गुजरातमध्ये २0 लाख तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. विविध आंदोलनांत सहभागी होत आहेत. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी व अल्पेश ठाकूर यांनी ज्ञाती संघटनांच्या मंचावरून असंतोषाचा हुंकार ऐकवला. मात्र तिन्ही आंदोलनांचे मुख्य सूत्र बेरोजगारी हेच आहे. या नेत्यांच्या आंदोलनात बेरोजगारी, महागाई व गरिबीच्या समस्यांचेच सूर ऐकायला मिळतात. गुजरातेत ४५ हजारांहून अधिक लघू व मध्यम कारखाने बंद पडले आहेत. बेरोजगारांच्या संख्येत त्यामुळे वाढ झाली आहे. नॅनोपेक्षा बंद कारखाने सुरू करावेत, असेही ते म्हणाले.>सामान्य जनतेला परवडेल, अशा दरात उच्चशिक्षणाच्या सोयी द्या!मी शेतकरी कुटुंबात जन्मलो. मला ४0 वर्षांपूर्वी १९७५ साली एमबीबीएससारखी पदवी मिळवता आली, कारण मला अवघी ३00 रुपये फी भरावी लागली. आज त्याच पदवीसाठी किमान एक कोटी रुपये खर्च येतो. तुम्ही ४0 वर्षांत कुठे नेऊ न ठेवलाय हा देश? शिक्षण महागले आहे. खासगी संस्थांनी या क्षेत्रावर कब्जा केलाय. त्यांना कोण रोखणार? सामान्य जनतेला परवडेल, अशा दरात देशात उच्चशिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असेही तोगडिया म्हणाले.
निवडणुकीत मूळ मुद्दा बेरोजगारीच्या समस्येचाच, प्रवीण तोगडियांचे परखड मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 04:13 IST