शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महिंदा राजपक्षे झाले श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 02:15 IST

पुढील वर्षीपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान; राष्ट्राध्यक्षांचे थोरले बंधू; एकाच कुटुंबात देशाची सत्तासूत्रे

कोलंबो : श्रीलंकेच्या राजकारणातील बलशाली नेते व माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे आता पंतप्रधान बनले आहेत. त्यांचा शपथविधी गुरुवारी पार पडला. याआधीचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्याने या घडामोडी झाल्या.नवे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांचे महिंदा हे थोरले बंधू आहेत. श्रीलंकेमध्ये पुढील वर्षी आॅगस्टमध्ये सार्वत्रिक निवडणूक असून, तोपर्यंत महिंदा काळजीवाहू पंतप्रधान काम पाहतील. महिंदा हे २००५ ते २०१५ या कालावधीत श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष होते. गेल्या वर्षी ते अल्पकाळासाठी पंतप्रधानही होते.राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीचा (यूएनपी) दणदणीत पराभव झाल्याने त्यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर गोताबाया राजपक्षे यांनी पंतप्रधानपदासाठी महिंदा यांचे नाव सुचविले होते. याआधी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांनी २६ आॅक्टोबर २०१८ रोजी विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरून ती सूत्रे महिंदा राजपक्षे यांच्याकडे सोपविली होती. मात्र, त्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला.श्रीलंकेचे पार्लमेंट बरखास्त करण्याचा सिरिसेना यांनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर आहे, असा तेथील सर्वोच्च न्यायालयाने एकमताने निर्णय दिला. त्यामुळे महिंदा यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले आणि विक्रमसिंघे यांची पुन्हा वर्णी लागली. महिंदा व गोताबाया राजपक्षे यांनी चालविलेल्या मोहिमेमुळे एलटीटीई ही तामिळ बंडखोर संघटनेचा संपूर्ण नि:पात झाला होता. श्रीलंकेच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. (वृत्तसंस्था)राष्ट्राध्यक्षांवरील आरोप रद्दबातल१ लाख ८५ हजार डॉलरचा घोटाळा केल्याप्रकरणी श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्यावर असलेले सारे आरोप श्रीलंकेतील उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्दबातल केले, तसेच परदेश प्रवासावर लादलेली बंदीही उठविण्यात आली असून, त्यांचा पासपोर्टही परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात कोणतेही दिवाणी किंवा फौजदारी खटले चालविण्यात येऊ नयेत, अशी श्रीलंकेच्या राज्यघटनेमध्ये तरतूद आहे. त्यामुळे हे खटले मागे घेण्यात यावेत, असे डेप्युटी सॉलिसिटर जनरल दिलिपा पेरीस यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका