नाशिक : श्री माहेश्वरी बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने येत्या शुक्रवारी (दि.६) हास्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी साडेचार वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार्या या कविसंमेलनात अनेक मान्यवर कवी सहभागी होणार असून, यात राजस्थान येथील केसरदेव मारवाडी, अनिरुद्ध मदेशिया, दिनेश बावरा, पार्थ नवीन, प्रग्या विकास आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय मंत्री श्यामजी जाजू हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
माहेश्वरी ट्रस्टतर्फे उद्या हास्य कविसंमेलन
By admin | Updated: March 4, 2015 23:38 IST