शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

Mahatma Gandhi Death Anniversary : प्रभावशाली चळवळींपैकी एक मिठाचा सत्याग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 11:37 IST

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली १९३० साली भारत स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता.

ठळक मुद्दे१९३० साली भारत स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह हा असहकार चळवळीचा एक भाग होता.हजारोंच्या संख्येने लोक महात्मा गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते.

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. त्याविषयी काही माहिती आपण पाहूया. 

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली १९३० साली भारत स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता. त्यावेळी भारतातील ब्रिटिश सरकारने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची घोषणा केली याची सुरूवात दांडी यात्रेने झाली. 

मिठाचा सत्याग्रह हा असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. महात्मा गांधींना या सत्याग्रहाच्या माध्यमातून लोकसंघटन आणि लोकजागृती करायची होती. यावेळी दांडी यात्रेची सुरुवात साबरमती आश्रमापासून सुरु झाली होती. हजारोंच्या संख्येने लोक महात्मा गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते. २४ दिवस आणि ३९० किलोमीटर ही यात्रा चालली होती. १२ मार्चला अहमदाबादहून निघालेली यात्रा, ६ एप्रिलला दांडीला पोहोचली होती.

महात्मा गांधी यांनी काढलेली ही दांडी यात्रा इंग्रजांची भारतातील पाळेमुळे उखडण्याच्या प्रयत्‍नांमधील सर्वांत यशस्वी प्रयत्‍न ठरली. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादी ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली होती.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी