शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीला शिवलिंगावर डोकं टेकवताच महिलेचा मृत्यू; गावात हळहळ व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 16:37 IST

शिवमंदिर पुजेसाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू; शिवलिंगावर डोकं टेकवताच महिला गतप्राण

गोरखपूर: उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. शिवलिंगावर डोकं टेकवताच महिला गतप्राण झाल्यानं सध्या सर्वत्र या घटनेची चर्चा होत आहे. शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेची हालचाल अचानक बंद झाल्यानं तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शिवलिंगावर डोकं टेकवताच महिला मरण पावल्याची माहिती वाऱ्याच्या वेगानं गावात पसरली. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.गोरखपूरमधल्या नौसड चौकाजवळ असलेल्या हरैया गावात एक शिवमंदिर आहे. गावात राहणारे ६५ वर्षीय जमुना प्रसाद कसौधन (वय ६५ वर्षे) महाशिवरात्र असल्यानं पत्नी विभक्ती देवी (वय ६० वर्षे) सोबत पहाटे ४ वाजता मंदिरात गेले होते. त्यांनी शंकराला जलाभिषेक केला. यानंतर शिवलिंगावर हात ठेवून त्यांना डोकं टेकलं. विभक्ती देवींनी डोकं टेकताच त्या गतप्राण झाल्या.आजीनं शिवलिंगावर डोकं टेकवताच त्यांच्या शरीराची हालचाल थांबली, अशी माहिती त्यांचे नातू रमेश कुमार यांनी दिली. विभक्ती देवी यांच्या हालचाल थांबताच जमुना प्रसाद यांनी त्यांना अनेकदा आवाज दिला. उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच उपयोग झाला नाही. आपली पत्नी जग सोडून गेल्याचं जमुना प्रसाद यांना समजताच त्यांनी आक्रोश केला. विभक्ती यांचा स्वभाव लहानपणापासून अतिशय अध्यात्मिक स्वरुपाचा होता. त्या घरीदेखील पूजा-पाठ करायच्या. महाशिवरात्रीला शिवलिंगावर डोकं टेकवताच त्यांचा मृत्यू झाल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री