शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पाच राज्यांत बर्ड फ्लूमुळे महाराष्ट्रही झाला सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 05:47 IST

विषाणूचे माणसांत संक्रमण होण्याची भिती

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा व हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्लूची साथ आली असून, महाराष्ट्रामध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पक्ष्यांतूनच बर्ड फ्लूच्या विषाणूचे माणसांत संक्रमण होण्याची शक्यता असल्याने व या आजाराने मरण पावलेल्यांचे प्रमाणही अधिक असल्यामुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आधीच सारे जग कोरोना साथीच्या विळख्यात सापडले असताना, आता बर्ड फ्लूने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोंबड्या व अंड्यांच्या किमती गेल्या काही दिवसांत घसरल्या आहेत. चीनमध्ये १९९६ साली सर्वप्रथम बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यानंतर, आजतागायत जगातील विविध भागात बर्ड फ्लूची साथ डोक वर काढत असते. २००६ मध्ये महाराष्ट्रात नंदूरबार येथे बर्ड फ्लू पसरला होता. बर्ड फ्लूच्या विषाणूचे माणसामध्ये संक्रमण झाल्यानंतर पहिला रुग्ण हाँगकाँगमध्ये १९९७ साली सापडला होता.

पंजाब : कोंबड्यांची आयात बंदीचंदीगड : बर्ड फ्लूची साथ पंजाबमध्ये पसरू नये, म्हणून तेथील राज्य सरकारने अन्य राज्यांतून कोंबड्या, तसेच इतर पाळीव पक्षी आयात करण्यास १५ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. पंजाबशेजारील हरयाणा, हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव झाल्यामुळे पंजाब सरकार सतर्क झाले होते. या साथीचा लवलेशही पंजाबमध्ये नसला, तरी तेथील राज्य सरकार कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBird Fluबर्ड फ्लू