शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत घुमला आवाज मराठी, डॉ. अमोल कोल्हेंनी उच्चारलं 'जय शिवराय' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 08:47 IST

औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी कोणत्या भाषेत खासदारकीची शपथ घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती मात्र त्यांनी मराठीतून शपथ घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. 

नवी दिल्ली - 17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी संसदेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. अनेक खासदारांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत शपथ घेतली. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ते महाराष्ट्रातील खासदार कोणत्या भाषेत शपथ घेतील याकडे. 

महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांची मराठी भाषेतून शपथ घेतली. भाजपाचे रावसाहेब दानवे, शिवसेनेचे अरविंद सावंत या केंद्रीय मंत्र्यांनी खासदारकीची शपथ मराठीतून घेतली. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, धैर्यशील माने, नवनीत राणा, प्रितम मुंडे यांनी लोकसभेत मराठीतून शपथ घेतली. औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी कोणत्या भाषेत खासदारकीची शपथ घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती मात्र त्यांनी मराठीतून शपथ घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. तर सुप्रिया सुळे यांनी हिंदीतून आणि, सातारचे खासदार उदयनराजे भोसले, डॉ. सुजय विखे यांनी इंग्रजीतून सदस्यत्वाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली त्याचसोबत जय शिवराय, जय महाराष्ट्र असं उच्चारताच संसदेत जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणाबाजी झाली. 

भाजपाचे मनोज कोटक, शिवसेनेचे विनायक राऊत, ओमप्रकाश निंबाळकर,सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, गजानन किर्तीकर यांच्यासह अन्य खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. पूनम महाजन, हिना गावित, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, गोपाळ शेट्टी ह्यांनी हिंदीतून शपथ घेतली तर सुजय विखे, उदयनराजे भोसले ह्यांनी इंग्रजीमधून तर गिरीष बापट, उन्मेश पाटील, सुनील मेंढे ह्यांनी संस्कृत मधून शपथ घेतली.अनेक दिवसांपासून संसदेत महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी यासाठी सोशल मिडीयावर मोहीम सुरु होती. ट्विटर, फेसबुक अशा माध्यमातून खासदारांना मराठीत शपथ घ्यावी यासाठी प्रोत्साहित केलं जात होतं. 17 व्या लोकसभेत भाजपाचे 22 खासदार, शिवसेनेचे 18 खासदार, काँग्रेस 1 आणि राष्ट्रवादीचे 5 खासदार निवडून गेले आहेत. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेMember of parliamentखासदारlok sabhaलोकसभा