शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

 महाराष्ट्र, गुजरात प्रतिबंधित कापूस बियाणांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 04:59 IST

महाराष्ट्राच्या १२ जिल्ह्यांत यावर्षी ४० गुन्हे दाखल

नितीन अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात प्रतिबंध असूनही हबीसाईट टॉलरेंट बीटी कापूस बियाणांची विक्री महाराष्ट्रासह अनेक राज्यांत सुरू आहे. केंद्र सरकारने या राज्यांत बेकायदेशीरपणे या बियाणांच्या विक्रीचे प्रकार घडल्याचे मान्य केले. असे सर्वात जास्त बियाणे महाराष्ट्रात पकडले गेले.कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यानुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये नंदुरबार, जळगाव, धुळे, बीड, जालना, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२,१४८ पाकीट बंद तथा १२९३ किलो बियाणे जप्त झाले व अवैध कापूस बियाणांप्रकरणी दोषींविरुद्ध ४० गुन्हे दाखल झाले.मंत्र्यांनी लोकसभेत म्हटले की, महाराष्ट्रच नव्हे, तर गुजरातमध्येही आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये चार जिल्ह्यांत कापसाच्या बेकायदा पीक विक्रीच्या पाच घटना समोर आल्या आहेत. त्यातील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात तोमर म्हणाले, तेलंगणच्या सीमावर्ती अदिलाबाद, मंचेरियल आणि असिफाबादसारख्या जिल्ह्यांत अशा बियाणांबाबत पोलीस संबंधित लोकांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहे.बेकायदा कापूस बियाणे विक्रीप्रकरणी एक आंतरमंत्रालय निरीक्षण तथा वैज्ञानिक समिती स्थापन झाली आहे. या समितीने तात्काळ, अल्पकालिक व मध्यकालिक कारवाईची सूचना केली. याशिवाय कापूस उत्पादक राज्यांना याबाबत निर्देशही दिले गेले आहेत.प्रतिबंधित रसायन, कीटनाशकाची विक्री नाहीमहाराष्ट्रासह इतर राज्यांत अवैध रसायन तथा कीटनाशकांची विक्री होत असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट नाकारले. प्रतिबंधित रसायने, कीटनाशकांच्या विक्रीबाबतच्या प्रश्नावर त्यांनी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू,उत्तराखंड, पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, केरळ, ओदिशा, गोवा, मेघालय व मिझोराम राज्य सरकारांच्या हवाल्याने सांगितले की, असे काही घडलेले नाही. महाराष्ट्र, गुजरात व तेलंगणमध्ये अवैध रसायनांची विक्री झालेली नाही.

टॅग्स :lok sabhaलोकसभा