शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा रात्री उशिरा घरी परतले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 10:14 IST

Maharashtra Assembly Election 2024: जवळपास ३६ तासांपासून बेपत्ता असलेले श्रीनिवास वनगा हे रात्री उशिरा घरी परतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र घरी आल्यानंतर कुटुंबीयांची भेट घेऊन ते पुन्हा निघून गेल्याचंही कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.

पालघर येथून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर  शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे मंगळवारी दिवसभर नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, जवळपास ३६ तासांपासून बेपत्ता असलेले श्रीनिवास वनगा हे रात्री उशिरा घरी परतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र घरी आल्यानंतर कुटुंबीयांची भेट घेऊन ते पुन्हा निघून गेल्याचंही कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी नाकारल्यानंतर धक्का बसलेल्या श्रीनिवास वनगा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भावूक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे वनगा यांच्या कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. तसेच पोलीसही त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, रात्री उशिरा श्रीनिवास वनगा हे घरी परतले, अशी माहिती त्यांची पत्नी सुमन वनगा यांनी दिली. प्रकृती ठीक नसल्याने श्रीनिवास वनगा हे सध्या विश्रांती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीच्या जागावाटपामध्ये पालघरची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटल्याने तिथून विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र ऐनवेळी येथे श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे श्रीनिवास वनगा हे नाराज झाले होते. तसेच तू मतदारसंघात निवडून येत नाही, तुझ्याबाबतीत नकारात्मक अहवाल आलाय हे कारण देऊन मला मागेही थांबवले, मी प्रामाणिकपणे थांबलो. प्रत्येक वेळी गावितांना तिकिट दिले. जेव्हा जेव्हा चांगली संधी येते, मी चांगले काम केले तरीही मला डावलण्यात आलं असं सांगत आमदार श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४palghar-acपालघरShiv Senaशिवसेनाpalgharपालघर