शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीयन बाबांच्या 'या' २ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या; स्वतःच सांगितली संपूर्ण गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:12 IST

Abhay Singh : आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस इंजिनिअरिंग केलं आहे. पण लाखो रुपयांची नोकरी सोडल्यानंतर आता स्वतःला पूर्णपणे अध्यात्मात वाहून घेतलं आहे.

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत आणि ऋषी आले आहेत. य़ातील अनेक बाबा खूप लोकप्रिय होत आहेत. त्यामध्ये आयआयटीयन बाबा ​​अभय सिंह यांचंही नाव आहे. त्यांनी आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस इंजिनिअरिंग केलं आहे. पण लाखो रुपयांची नोकरी सोडल्यानंतर आता स्वतःला पूर्णपणे अध्यात्मात वाहून घेतलं आहे. बाबांनी दावा केला की, त्यांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी स्वतः यापैकी दोन गोष्टींबद्दल सांगितलं आहे.

एबीपी न्यूजशी बोलताना, आयआयटीयन बाबांनी त्यांच्या भविष्यवाणींचा उल्लेख केला आणि सांगितलं की, त्यांनी क्रिकेटपटू सूर्य कुमार यादव आणि बुद्धिबळ विश्वविजेता डी गुकेश या दोघांबाबत दोन भविष्यवाणी केल्या होत्या. वर बसलेले महादेव हे सर्व घडवून आणतात, ते आपल्याला दिशा दाखवतात आणि आपण सर्वजण ते करत राहतो.

"मी तुम्हाला अशा अनेक गोष्टी सांगेन ज्या तुम्हाला विचित्र वाटतील. जसं की जेव्हा भारताचा वर्ल्ड कप होत होता.....टी-२० वाला, वन डे मध्ये माझं कोणीही ऐकलं नाही. मी म्हणालो की, सूर्य कुमार यादव... चला याला स्टार बनवूया, तो सेंच्युरी करेल, तेव्हा मध्येच शेजारी एक डॉक्टर आले आणि त्यांनी त्यावेळी ब्रेक केलं."

"गुकेशची बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती. म्हणून मी पाहिले की ही चाल अशी चालू आहे... ती अशी अशी करावी लागेल... म्हणून मी सुरुवातीला व्हिज्युलायजर करण्याची टेक्निक चालवली. मी हे सर्व माझ्या समजुतीने करत नाही... सर्व गोष्टींचं ज्ञान नेहमीच वरून मिळतं. मी खाली असलेल्या जगात आहे. ... महादेव सर्वांपेक्षा वर आहेत. ते सगळं पाहत आहेत. जसं नेव्हिगेशन चालतं, इकडे जा, तिकडे जा... जसं बोललं जातं तसं फॉलो करा" असं म्हटलं आहे. 

आयआयटीयन बाबा हे हरियाणाचे रहिवासी आहेत. त्यांचं खरं नाव अभय सिंह आहे. त्यांनी आयआयटी मुंबई येथून डिग्री घेतली आहे. त्यानंतर एका मोठ्या कंपनीत लाखो रुपयांची नोकरीही मिळाली. पण या सगळ्यात त्यांना रस नव्हता. नंतर सर्व इच्छा सोडून अध्यात्माचा मार्ग निवडला.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल