शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मदरशांमध्ये नथुराम गोडसे, प्रज्ञा ठाकूरसारखी माणसं जन्माला येत नाहीत- आझम खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 11:33 IST

वादग्रस्त विधान करून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा प्रज्ञा ठाकूर यांच्या आडून भाजपाला लक्ष्य केलं आहे.

नवी दिल्लीः वादग्रस्त विधान करून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा प्रज्ञा ठाकूर यांच्या आडून भाजपाला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा हत्यारा असलेल्या नथुरामचा उल्लेख करत आझम खान म्हणाले, मदरशांमध्ये नथुराम गोडसे आणि प्रज्ञा सिंह ठाकूर सारखे लोक जन्माला येत नाहीत. एएनआयच्या वृत्तानुसार, मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या मोदींच्या भूमिकेवर विचारलेल्या प्रश्नाला आझम खान यांनी उत्तर दिलं आहे. आझम खान म्हणाले, मदरशात नथुराम गोडसेच्या स्वभावाची माणसं अन् प्रज्ञा ठाकूरसारख्या व्यक्ती जन्माला येत नाहीत. दहशतवादी कारवायात सहभागी असलेल्या लोकांचं उदात्तीकरण होऊ शकत नाही. 2008मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर जामिनावर बाहेर आहेत. गेल्याच वर्षी भोपाळमधून भाजपाच्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या आहेत. प्रचारादरम्यानही त्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होत्या. ज्यात त्यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं होतं. आझम खान यांच्या मते, केंद्राला खरोखरंच मदरशांना मदत करायची असल्यास त्यात सुधारणा करावी लागेल.उत्तर प्रदेशमधल्या रामपूरच्या मतदारसंघातील एसपी नेत्यानं सांगितलं की, मदरशांमध्ये धार्मिक शिक्षा दिली जाते, तिथे इंग्रजी आणि हिंदी, गणिताचेही धडे शिकवले जातात. हे नेहमीच होत असतं. त्याचा स्तर सुधारला पाहिजे. मदरशांना इमारत बांधून द्या, त्यांना फर्निचर आणि मिड-डे मिल उपलब्ध करून दिलं पाहिजे, असं मतही आझम खान यांनी व्यक्त केलं आहे.