शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयानं कार्ती चिदंबरमविरोधातल्या लूकआऊट नोटीसला दिली स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 16:16 IST

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमविरोधात सीबीआयकडून जारी करण्यात आलेल्या लूकआऊट नोटीसला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय.

चेन्नई, दि. 10 - माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमविरोधात सीबीआयकडून जारी करण्यात आलेल्या लूकआऊट नोटीसला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय. न्यायमूर्ती एम. दुराईस्वामी यांनी सुनावणीदरम्यान लूक आऊट नोटीसला स्थगिती दिली आहे. कार्ती यांच्या वतीनं वरिष्ठ वकील गोपाल सुब्रमणियन आणि सतीश परासरन यांनी युक्तिवाद केला. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त सॉलिसिटर-जनरल जी. राजागोपालन उपस्थित होते. सीबीआयने ही नोटीस जारी केली असून कार्ती चिदंबरम यांना देश सोडून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचारप्रकरणी कार्ती चिदंबरम यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, कार्ती चिदंबरम यांनी सीबाआयच्या नोटीसला विरोध करत मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही नोटीस रद्द करण्याची कार्ती यांची मागणी मद्रास हायकोर्टानं मान्य केली आहे. जेव्हा एखादी संशयित व्यक्ती तपासाला बगल देत देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असते, अशा वेळी तपास यंत्रणा सरकारला लूकआऊट नोटीस जारी करण्याची विनंती करते. कार्ती चिदंबरम यांनी देशाबाहेर दौरा करण्याआधी त्याची माहिती सीबीआय तसंच सक्तवसुली संचलनालयाला द्यावी असं नोटीसमध्ये सांगण्यात आलं होतं. तपास यंत्रणांनी संमती दिली तरच कार्ती चिदंबरम देशाबाहेर प्रवास करू शकतात. कार्ती चिदंबरम यांनी मात्र आपण कोणतंही चुकीचं काम केलं नसून, राजकीय हेतून आरोप होत असल्याचा दावा केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयही (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी कार्ती यांच्यासह आयएनएक्स मीडियावर एफआयआर दाखल केला होता. या दोघांवर विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाकडून (एफआयपीबी) मंजुरी मिळवून विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सीबीआयनेही कार्ती चिदंबरम आणि आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर दाखल केला होता. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता. पी चिदंबरम यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले होते.