शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कामात हस्तक्षेप करू नका; हायकोर्टाकडून किरण बेदींची खरडपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 13:23 IST

नायब राज्यपाल किरण बेदींना हायकोर्टाचा धक्का

पुद्दुचेरी: मद्रास उच्च न्यायालयानं पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना जोरदार धक्का दिला आहे. सरकारी कामांमध्ये हस्तक्षेप करू नका, असे आदेश न्यायालयानं बेदी यांना दिले आहेत. यामुळे पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामींना मोठा दिलासा मिळाला आहे. पुद्दुचेरीच्या दैनंदिन कामकाजात ढवळाढवळ करण्याचे अधिकार तुम्हाला नाहीत, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं बेदींना फटकारलं. पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्याचा हक्क नायब राज्यपाल किरण बेदींना नाहीत. याशिवाय पुद्दुचेरी सरकारकडून कोणतीही कागदपत्रं मागवण्याचा अधिकारदेखील राज्यपालांना नाही, असं उच्च न्यायालयानं आदेशात म्हटलं. पुद्दुचेरीतील काँग्रेस आमदार लक्ष्मीनारायणन यांनी 2017 मध्ये मद्रास उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालांना प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का, याबद्दलची विचारणा लक्ष्मीनारायणन यांनी याचिकेच्या माध्यमातून केली होती. नायब राज्यपाल किरण बेदी आणि मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांच्यात प्रशासकीय अधिकारांवरुन अनेकदा खटके उडाले आहेत. किरण बेदी केंद्राच्या आदेशांवरुन पुद्दुचेरीतील कामकाजात अडथळे आणत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. 'नायब राज्यपालांना कोणतेही अधिकार नाहीत. मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयांवर स्वाक्षऱ्या करणं हेच त्यांचं काम आहे. त्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांना नाही. मात्र पंतप्रधानांच्या इशाऱ्यावर काम करुन त्या कामकाजात अडथळे आणतात,' असं नारायणस्वामींनी म्हटलं होतं. याबद्दल बेदींनी नाराजी व्यक्त केली होती. अवघ्या आठवड्याभरात पत्रांना उत्तरं द्यावी, असं मुख्यमंत्री सांगतात. त्यासाठी धरणं आंदोलन करतात. तथ्यहीन आरोप करतात. मुख्यमंत्र्यांची ही कृती वाईट असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.  

टॅग्स :Kiran Bediकिरण बेदी