शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: स्टंट करताना तोंडावर बसली लाथ; स्विमिंग पूलमध्ये तरुणाचा धक्कादायक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:42 IST

मध्य प्रदेशात स्विमिंग पूलमधल्या स्टंटबाजीमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Viral Video : देशभरात उन्हाच्या झळा बसत असल्याने अनेकजण त्यापासून वाचण्यासाठी स्विमिंग पूलचा आधार घेताना दिसत आहेत. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण स्विमिंग पूलचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. मात्र याच स्विमिंग पूलमधील स्टंटबाजीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. स्विमिंग पूलमध्ये मित्राच्या चुकीमुळे तरुणाचा बुडतानाचा एक सीसीटीव्ही व्हिडीओदेखील समोर आला आहे. मित्राच्या स्टंटबाजीमुळे तरुणाचा जीव गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

मध्य प्रदेशतील रतलाम जिल्ह्यातून ही मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रतलाम जिल्ह्यातील सैलाणा रोडवर असलेल्या डॉल्फिन स्विमिंग पुलमध्ये रविवारी हा अपघात झाला. मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मित्राच्या स्टंटमुळे मृत्यू झाला. स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना एका तरुणाचा पाय मृताच्या चेहऱ्याला लागल्याने तो पाण्यात बुडाला. तरुणाला बाहेर काढून वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला जबर धक्का बसला आहे.

रविवारी संध्याकाळी अनिकेत तिवारी हा मित्र पियुष, हर्ष आणि तुषार पडियारसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी आला होता. मात्र स्टंटबाजी करताना १८ वर्षीय अनिकेतला आपला जीव गमवावा लागला. ही घटना घडली तेव्हा लाइफ गार्ड असता तर अनिकेतला वेळीच रुग्णालयात नेल्याने त्याचा जीव वाचू शकला असता. धक्कादायक बाब म्हणजे अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतरही स्विमिंग पूल उशिरापर्यंत सुरुच होता. त्यामुळे स्विमिंग पूल चालकाचा निष्काळजीपणा दिसून आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पूल बंद केला. 

नेमकं काय घडलं?

मृत तरुणाचे नाव अनिकेत असल्याचे समोर आलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये मृत अनिकेत स्विमिंग पूलमधून बाहेर येऊन कठड्यावर बसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तितक्यात अनिकेतच्या शेजारच्या तरुणाच्या डोक्यावरुन एका तरुणाने उडी मारली. मात्र अनिकेत बाहेर येत असतानाच तरुणाचा गुडघा त्याच्या चेहऱ्यावर आदळल्याने तो पाण्यात पडला. सुरुवातीला तिथे असलेल्या लोकांना काहीच कळालं नाही. शेवटी अनिकेत पाण्यातून बाहेर न आल्याने त्याच्या मित्रांनीच त्याला वर काढले. अनिकेतला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी सहा मिनिटे लागली. हा सगळा प्रकार घडला तेव्हा घटनास्थळी एकही लाइफ गार्ड उपस्थित नव्हता. त्यानंतर अनिकेतला वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, स्विमिंग पूलमधील लाइफ गार्डच्या निष्काळजीपणामुळे अनिकेतचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या मित्राने केला आहे. "आम्ही स्विमिंग पूलमधील लाइफ गार्डला अनिकेतचा पूलमध्ये शोध घेण्यास सांगितले होते. पण ते बराच वेळ आले नाहीत. नंतर एक ट्रेनर आला ज्याने अनिकेतचा शोध घेतला आणि त्याला स्विमिंग पूलमधून बाहेर काढले. यानंतर अनिकेत रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात  डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनिकेतला सुमारे सहा मिनिटे २० सेकंदांनंतर स्विमिंग पूलमधून बाहेर काढण्यात आले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला,” अशी माहिती अनिकेतचा मित्र पीयूषने दिली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलAccidentअपघात