शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मध्य प्रदेशची आदिवासी मुलगी आॅक्सफर्डला

By admin | Updated: September 18, 2016 05:58 IST

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या १६ वर्षांच्या वर्षीय आशा गोंड या आदिवासी मुलीसाठी आकाशच ठेंगणे झाले आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या १६ वर्षांच्या वर्षीय आशा गोंड या आदिवासी मुलीसाठी आकाशच ठेंगणे झाले आहे. ती आता इंग्रजी भाषा शिकण्यासाठी थेट आॅक्सफोर्डला निघाली आहे. पासपोर्टचं काम पूर्ण झालं की लवकरच ती इंग्लंडला रवाना होईल. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर स्वप्नही सत्यात उतरते. फक्त गरज असते ती चिकाटीची. आशा गोंडच्या बाबतीत नेमके असेच घडत आहे. आशा गोंड मूळची जानवार गावातील आहे. जर्मनीहून रेनहार्ड या तेथील आदिवासी मुलांना स्केटिंग आणि इंग्रजी भाषा शिकवायला आल्या होत्या. त्यामध्ये आशाचाही समावेश होता. त्यांच्यासोबत शिकताना आशाने इंग्रजी आत्मसात केली. त्या भाषेविषयीचे तिचे कुतुहूल वाढत गेली आणि आवडही तिची प्रगती पाहून रेनहार्ड यांनी आशाला इंग्लंडला सोबत नेऊन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. आशा नुकतीच दहावीची परीक्षा पास झाली आहे. इंग्रजीमध्येही तिने चांगली प्रगती केली आहे. इंग्लंडला नेऊन इंग्रजी भाषा शिकवण्याचे आश्वासन मी तिला दिले होते. तिचे आई-वडील मुलीला पाठवण्यास तयार नव्हते. त्यांना तयार करण्यात आठ महिने गेले. मी अनेकदा आईशी बोलले. तिला परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचे महत्त्व त्यांना पटवून देणे अवघड होते, असे रेनहार्ड म्हणाल्या.पालक तयार होत नव्हते. त्यांना मुलीची काळजी वाटत होती. त्यामुळे रेनहार्ड यांनी स्थानिक आमदार आणि आशाचे शिक्षक अवध बिहारी यांची मदत घेतली. तुमची मुलगी सुरक्षित राहील आणि तिला खूप शिकायची संधी मिळेल, असे त्यांनी पटवून दिले. तेव्हा कुठे ते परदेशात मुलीला पाठवायला तयार झाले. (वृत्तसंस्था)>इतरांनाही इंग्रजी शिकविणारआशाने मिळालेल्या संधीचे नेहमीच सोने केले आणि यापुढेही करण्याचे आहे. आहे. इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन पुन्हा परत आल्यानंतर मुलांना शिकवण्याची तिची इच्छा आहे. परत आल्यानंतर लगेच लग्न लावून देण्याचे तिच्या आई-वडिलांनी ठरविले आहे.