शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Coronavirus: राजकारणामुळे सरकारचं कोरोना प्रतिबंधांकडे दुर्लक्ष, 'या' जिल्ह्यातील लोकांनी स्वतःच लावला लॉकडाउन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 16:08 IST

येथील लोकांनी लॉकडाउनचा निर्णय स्वेच्छेने घेतला आहे. तसेच आवश्यकता भासल्यास हा दोन दिवसांचा लॉकडाउन आणखीही वाढविला जाऊ शकतो, असे येथील लोक म्हणत आहेत. (self imposed lockdown)

भोपाळ - मध्यप्रदेशात (Madhya pradesh) कोरोनाची दुरसी लाट हाताबाहेर जाताना दिसत आहे. येथे सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील अनेक शहरांत विकेंड लॉकडाउन लावण्यात आला आहे. मात्र, पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील दमोह जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असतानाही शिवराज सरकारने लॉकडाउन लावला नाही. यानंतर दमोहच्या लोकांनी एक आदर्श ठेवत सरकारचा आदेश नसतानाही दोन दिवसांचा लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. (Madhya pradesh hinota in damoh district goes into self imposed lockdown amid corona virus surge shops shut for two days)

सरकारचे हात वर, लोकांनी संभाळली जबाबदारी -संपूर्ण राज्यात विकेंड लॉकडाउन लावण्यात आला. पण, दमोह जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असतानाही विकेंड लॉकडाउन का लावण्यात आला नाही? असा प्रश्न मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विचारला असता, ते म्हणाले, दमोह त्यांच्या अधिकार क्षेत्रात नाही. पोट निवडणुकीमुळे दमोह, निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येते. त्यामुळे सरकारने तेथे लॉकडाउन केलेला नाही. दमोह जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या सातत्याने वाढत आहे यामुळे येथील स्थिती अधिक गंभीर होत असल्याचे पाहून या जिल्ह्यातील एका गावातील लोकांनी स्वतःच लॉकडाउन लवला आहे.

स्वेच्छेने घरात बंद, बंद केली दुकानं -दमोह जिल्ह्यातील हटा ब्लॉकमधील हिनोता येथील लोकांनी प्रशासनाच्या आदेशाची वाट न पाहताच दोन दिवसांचा विकली लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनदरम्यान हिनोतामधील बाजार पूर्णपणे बंद होते. तसेच लोकही आपल्या घरातच आहेत.

आवश्यकता भासल्यास लॉकडाउन वाढवणार -हिनोताच्या लोकांनी म्हटले आहे, कोरोनाचा फैलाव पाहता चिंता वाढली आहे. त्यांच्या परिसरातही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नाही, तर कोरोनाने काही जणांचा बळीही घेतला आहे. यामुळे आमच्याकडे केवळ लॉकडाउन हाच एकमेव पर्याय होता. येथील लोकांनी लॉकडाउनचा निर्णय स्वेच्छेने घेतला आहे. तसेच आवश्यकता भासल्यास हा दोन दिवसांचा लॉकडाउन आणखीही वाढविला जाऊ शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशGovernmentसरकार