शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अवैध कफ सीरप बाळगणे ‘एनडीपीएस’चा गुन्हा- मध्यप्रदेश हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 05:38 IST

कफ सीरप किंवा मादक पदार्थ असलेली इतर औषधे वैध कागद पत्रा शिवाय बाळगणे एनडीपीएस  ॲक्टप्रमाणे गुन्हा ठरू शकतो

- डॉ. खुशालचंद बाहेतीभोपाळ : कफ सीरप किंवा मादक पदार्थ असलेली इतर औषधे वैध कागद पत्रा शिवाय बाळगणे एनडीपीएस  ॲक्टप्रमाणे गुन्हा ठरू शकतो. या मादक पदार्थविरोधी कठोर कायद्यात किमान १० वर्षे ते जन्मठेपेची शिक्षा आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.२५ एप्रिल २०२१ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी एक मोटारसायकल अडवली. २ स्वार तिच्यावर बसून जात होते. मोटारसायकलच्या झडतीमध्ये ओनरेक्स कफ सीरपच्या १०० मिलीच्या ३० बाटल्या आढळून आल्या. या कफ सीरपमध्ये कोडीन फॉस्फेट हा मादक पदार्थ असतो. दोघांकडे या कफ सीरपची प्रिस्क्रिप्शन किंवा इतर कागदपत्रे नव्हती. त्यांच्याविरुद्ध एनडीपीसी ॲक्ट १९८५ च्या कलम ८ (मादक पदार्थ बाळगण्यास बंदी), २१, २२ (अवैधपणे मादक पदार्थ बाळगल्याबद्दल १० वर्षे ते जन्मठेपेची शिक्षा) या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होऊन विशेष न्यायालयात जामीन फेटाळल्यानंतर आरोपीनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. न्या. राजीवकुमार दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचे संदर्भ देत जामीन फेटाळला.सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयमादक पदार्थ फक्त वैद्यकीय कारणासाठी किंवा संशोधनासाठी बाळगता येतात किंवा त्यासाठी त्यांची वाहतूक करता येते.हे पदार्थ बाळगताना किंवा वाहतूक करताना किंवा तयार करताना कायद्याने निश्चित केलेल्या पद्धतीचाच अवलंब केला पाहिजे.मादक पदार्थ उपचारासाठी नेण्यात येत होते किंवा ताब्यात होते हे सिद्ध करणे बाळगणाऱ्याची जबाबदारी आहे.कफ सीरपची मात्रा थोड्या प्रमाणात  होती किंवा व्यावसायिक प्रमाणात होती हे ठरविण्यासाठी कफ सीरपमध्ये किती प्रमाणात मादक पदार्थ आहे हे न पाहता संपूर्ण बाटलीत किती कफ सीरप आहे ते सर्व मादक पदार्थ म्हणुन मोजमाप केले पाहिजे. उदा. कफ सीरपमध्ये ०.१५ ग्रॅम मादक पदार्थ असेल; पण इतर द्रावण मिळून सीरप १०० ग्राम असेल तर कायद्याने १०० ग्राम मादक पदार्थ बाळगले समजण्यात येते. मादक पदार्थाची व्यावसायिक मात्रा बाळगल्याबद्दल कठोर शिक्षेची तरतूद आहे, अशा गुन्ह्यात जामीन देता येत नाही.