शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विवाहाचे आमिष दाखवून ‘संबंध’ ठेवणे हा बलात्कारच - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 02:56 IST

महिलेचे शरीर हे पुरुषाचे खेळणे नाही, असे ठणकावून सांगत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्काराचा आपल्यावरील गुन्हा रद्द करावा, यासाठी केलेली एका तरुणाची याचिका फेटाळली. आपण संबंधित महिलेशी विवाह करणार नाही, हे माहीत असून, तिच्याशी शरीरसंबंध ठेवणे ही फसवणूकच आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

 भोपाळ  - महिलेचे शरीर हे पुरुषाचे खेळणे नाही, असे ठणकावून सांगत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्काराचा आपल्यावरील गुन्हा रद्द करावा, यासाठी केलेली एका तरुणाची याचिका फेटाळली. आपण संबंधित महिलेशी विवाह करणार नाही, हे माहीत असून, तिच्याशी शरीरसंबंध ठेवणे ही फसवणूकच आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.भोपाळमध्ये नृत्याचे वर्ग चालवणाऱ्या महिलेने तेथील राजीव शर्मावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यांची फेसबुकवर ओळख झाली व पुढे त्याचे प्रेमात रूपांतर झाले. शर्माने त्या महिलेला लग्नाची मागणी घातली. तिने तयारी दाखवल्याने त्यांचे लग्नही ठरले. पण शर्माच्या आईचा या लग्नास विरोध होता. मात्र आपण तुझ्याशी विवाह करूच, असे आश्वासन त्याने दिले. नंतर शर्माने तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली. तसे संबंध ठेवण्यास तिला भागच पाडले. पण नंतर विवाह करायला नकार दिला.त्यामुळे महिलेने शर्माविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. त्याविरोधात शर्माने उच्च न्यायालयात अर्ज केला. शरीरसंबंधांना तिची संमती असल्याने याला बलात्कार म्हणता येत नाही, असा त्याचा युक्तिवाद होता. त्यावर विवाहाचे आश्वासन देऊन, शरीरसंबंधांची संमती मिळवल्याने ही फसवणूकच आहे, असे न्यायालयाने म्हटले. विवाह करणार नाही, हे माहीत असताना संबंध ठेवल्याबद्दल ताशेरे झोडताना, महिलेचे शरीर हे पुरुषाचे खेळणे नाही, येथे शर्मा याने केलेले कृत्य निंद्य व शिक्षा होण्यासारखे आहे, असे सांगून न्यायालयाने त्याचा अर्ज अमान्य केला. (वृत्तसंस्था)फाशीचा पुनर्विचार व्हावा, निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांचा अर्जनवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील चौघांपैकी दोघांनी आपल्याला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार व्हावा, यासाठी केलेल्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला.दक्षिण दिल्लीत १६ डिसेंबर २0१२ रोजी वैद्यकीय शिक्षण घेणा-या मुलीवर बलात्कार व नंतर तिला धावत्या बसमधून फेकून देणे या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. त्या प्रकरणात मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा व अक्षय कुमार सिंग या चौघांना फाशी सुनावण्यात आली होती.राम सिंग नावाच्या आरोपीने तुरुंगातच आत्महत्या केली होती. विनय शर्मा व पवन गुप्ता यांनी फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार व्हावा, अशी याचिका केली आहे. मुकेशच्या अशाच अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे, तर अक्षय कुमारचा अर्ज अद्याप सुनावणीला यायचा आहे.बलात्कारांचे प्रकार सुरूचबिहारशरीफ : बलात्काराविरोधात जनमत तयार होऊ न आणि केंद्र सरकारने कायद्यात कठोर बदल करूनही अशा प्रकारांत घट होण्याचे नाव नाही.बिहारमध्ये स्वत:च्या १६ वर्षांच्या मुलीवर गेले वर्षभर बलात्कार करणाºया आणि तिला धमकावणाºया बापाला पोलिसांनी अटक केली आहे.गुजरातच्या मोर्बी शहरात दोन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. तिचा देह एका नाल्यापाशी सापडला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. रोजंदारीवर काम करणाºया दाम्पत्याची ही मुलगी होती.आंध्र प्रदेशात आत्महत्याएका ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाºया ५५ वर्षांच्या पुरुषाने आत्महत्या केल्याचे आढळून आले. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात हा प्रकार घडला. तो त्या मुलीचा नातेवाईक होता.घरमालकास अटकपंजाबच्या पतियाळा शहरात तीन वर्षांच्या मुलीवरील बलात्काराबद्दल घरमालकास अटक केली आहे. एक कुटुंब सुरिंदरकुमार यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. मुलीची आई कामावरून घरी आली, तेव्हा मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. तिला आम्ही रुग्णालयात दाखल केले, तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. तेव्हा घरमालकाने तिला बाहेर नेले होते, अशी माहिती मुलाने दिली, अशी तक्रार मुलीच्या आईने नोंदवली.

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कारnewsबातम्या