शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

मध्यप्रदेशात ताई आणि भार्इंवर शिवराज सिंह भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 5:28 AM

इंदूरमधील जागासाठी रस्सीखेच; महाजन समर्थकांना तिकीट नाही, नेत्यांच्या कुटुंबातील १० जणांना उमेदवारी

आसिफ कुरणे

भोपाळ : मध्यप्रदेशच्या राजकारणात कैलाश विजयवर्गीय, सुमित्रा महाजन यांना मोठे नेते मानले जाते. त्यात कैलाश विजयवर्गीय तर कटशहाच्या राजकारणात माहीर आहेत. पण यंदा भाजपच्या तिकीटवाटपात मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचाच वरचष्मा राहिला. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन इंदूरमधून आठ वेळा लोकसभेवर गेल्या आहेत. ताई नावाने त्या सुपरिचित आहेत.

महासचिव कैलाश विजयवर्गीय भाई नावाने ओळखले जातात. दबावाच्या राजकारणात ते मुरलेले खेळाडू आहेत. पण यावेळी त्यांचे फासे हवे तसे पडले नाहीत. इंदूरमध्ये आपले नातेवाईक व समर्थकांना उमदेवारी मिळाली, यासाठी महाजन, विजयवर्गीय यांनी प्रयत्न केले. विजयवर्गीय यांनी इंदौर -२ मधून मुलगा आकाशसाठी तिकीट मागितले होते. तर मऊमधून तगडा आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा अंदाज विजयवर्गीय यांनी बांधला होता. पण शिवराज सिंह यांनी आकाश विजयवर्गीय याला इंदूर-३ मधून तर विद्यमान आ. उषा ठाकूर यांना महू येथून उमेदवारी दिली. कैलाश विजयवर्गीय मुलाखेरीज आ. रमेश मेंदोला वा माजी आ. जितू जिराती यांच्यासाठी प्रयत्नशील होते. त्यापैकी आकाश व रमेश मेंदोलाला उमेदवारी मिळाली.

सुमित्रा महाजन यांना मात्र इंदूरमधून मुलगा, सून व कार्यकर्त्याला उमेदवारी मिळवून देण्यात अपयश आले. तिकीट वाटपाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंदार महाजनसाठी इंदूर- १ किंवा ३ मधून उमेदवारी मिळवून देण्यासाठी सुमित्राताई प्रयत्नशील होत्या. त्यांना महू किंवा राऊमधून उमेदवारी शक्य होती. पण तेथून निवडून येण्याची संधी कमी असल्याने त्यांनी फारशी रूची दाखवली नाही. इंदूरच्या ९ पैकी एकाही जागेवर हव्या त्या व्यक्तीला उमेदवारी मिळवून देऊ शकल्या नाहीत. याला ताई-भाईमधील अंतर्गत वाद हेही कारण आहेच.

लोकसभेची गणितेसुमित्रा महाजन आता ७५ वर्षाच्या असल्यामुळे त्यांना २०१९ च्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल का याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच कैलाश विजयवर्गीय हे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्यापासून ते येथून लोकसभा लढवू शकतात असे त्यांचे समर्थक सांगतात. इंदूरमधील काही मतदारसंघात विजयवर्गीय यांचा दबदबा असून ते निवडणुकीचे पारडे फिरवू शकतात. विधानसभा निवडणुकीत त्यांना न मिळालेले तिकीट कदाचित लोकसभेच्या दृष्टीने संकेत असू शकतात.तिकीटवाटपात घराणेशाहीभाजप, काँग्रेसकडून तिकीटवाटपावेळी नेत्याची मुले, सुना, नातेवाईक यांना झुकते माप दिले आहे. भाजपच्या यादीत जवळपास ४० उमेदवार हे खासदार, आमदार, पक्षाचे नेते यांचे नातेवाईक आहेत. आकाश विजयवर्गीय , कृष्णा गौर, मुदीत शेजवर, विक्रम सिंह या नेतेपुत्रांना पक्षाने तिकिटे दिली आहेत, तर काँग्रेसकडून नेत्यांच्या कुटुंबातील १० जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूकshivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानvidhan sabhaविधानसभाMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018