शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:59 IST

राजा रघुवंशी प्रकरणात आता त्याची बहीण सृष्टी हिच्या विरोधात आसाम पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

राजा रघुवंशी प्रकरणात आता त्याची बहीण सृष्टी हिच्या विरोधात आसाम पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सृष्टी रघुवंशी हिने राजाच्या हत्येनंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या होत्या. यातील काही पोस्ट या आक्षेपार्ह असल्याचे म्हणत आता आसाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आसाममध्ये आपल्या भावाचा नरबळी दिला गेला असल्याचा दावा सृष्टीने केला होता. सोनम तंत्र मंत्र करण्यासाठीच राजाला गुवाहाटीला घेऊन गेली होती, असे देखील सृष्टी म्हणाली. 

नेमकं झालं काय?या प्रकरणी आता आसाम पोलिसांनी सृष्टी रघुवंशी हिला एक नोटिस पाठवली आहे. या नोटिसमध्ये असे म्हटले आहे की, 'सध्या सुरू असलेल्या तपासात तुमची चौकशी करण्यासाठी आमच्याकडे काही गोष्टी आहेत.' स्वतःची बाजू मांडण्यासाठी सृष्टीला गुवाहाटीला बोलावण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस तपासादरम्यान लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल सृष्टीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सृष्टीने मागितली माफी!सृष्टी रघुवंशी हिने केलेली पोस्ट ही प्रादेशिक आणि भाषिक वाद असल्याचे मानले जात आहे. मात्र, राजाचा मृतदेह सापडल्यानंतर आणि सोनमचं सत्य समोर आल्यानंतर सृष्टीने सोशल मीडियावर लोकांची माफी मागितली होती. परंतु, पोलिसांनी तिच्यावर धार्मिक भवन भडकवल्याचा आणि प्रादेशिक भाषिक वादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. राजाचा भाऊ विपिन यानेदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

सोनमच्या भावाची नार्को टेस्ट करा!एकीकडे पोलीस तपास सुरू असताना आता सोनमचा भाऊ गोविंद  देखील रघुवंशी कुटुंबाच्या निशाण्यावर आला आहे. राजाचा भाऊ विपिन याने गोविंद याची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली आहे. हा काहीतरी वेगळाच प्रकार असून, सोनम आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी राजाचा भाऊ सर्वोच्च न्यायालयात करणार आहे.     

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीguwahati-pcगौहतीhusband and wifeपती- जोडीदार