लखनऊः कमलेश तिवारी हत्याकांडात उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक केली आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसनं या प्रकरणात सूरतमधून सहा संशयितांना ताब्यात घेतलं. कमलेश तिवारी हत्या प्रकरणात बिजनोरच्या दोन मौलानांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर हत्येचा कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. मौलाना मुफ्ती नईम काजमी, इमाम मौलाना अनवारुल हक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, 2015ला या दोन्ही मौलानांनी कमलेशला ठार करणाऱ्याला 1.5 कोटींचं बक्षीस देणार असल्याचं सांगितलं होतं. कमलेश तिवारी यांची पत्नी किरन यांनी नाका हिंडोला पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेनंतर लखनऊ शहरात प्रचंड तणाव होतो, तसेच बाजारपेठा व दुकानं बंद करण्यात आली होती.
कमलेश तिवारी हत्याकांड : बिजनोरमधून मौलानाला अटक, गुजरातमधून सहा जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 09:42 IST