शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणाचा कळस! नर्सच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू पण कुटुंबीयांना वेगळंच सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 17:05 IST

नर्सच्या हातातून पडून नवजात बाळाचा मृत्यू झाला पण हे प्रकरण लपवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने खोटं सांगितलं.

नवी दिल्ली - लखनौमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका रुग्णालयाने निष्काळजीपणाचा कळस गाठला आहे. नर्सच्या हातातून पडून नवजात बाळाचा मृत्यू झाला पण हे प्रकरण लपवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने खोटं सांगितलं. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मात्र डोक्याला मार लागल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. तसेच बाळाच्या आईने नेमकं काय घडलं हे सांगितल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

बाळाच्या आईने नर्सच्या हातातून बाळ पडल्याचं सांगितलं आणि या प्रकरणाची पोलखोल झाली. याप्रकरणी पीडित कुटुंबाने रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार दिली असून पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील चिनहटमधील जुग्गौर येथील रहिवासी असलेल्या जीवन राजपूत यांनी 19 एप्रिल रोजी त्यांच्या गर्भवती पत्नीला प्रसूती वेदना झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. रात्री 10 ते 11 च्यादरम्यान पत्नीने मुलाला जन्म दिला. 

जन्मानंतर नवजात बाळ मरण पावलं. लेबर रूममध्ये पत्नीने आरडाओरडा सुरू केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. बाहेर उभ्या असलेल्या पतीसह अन्य नातेवाईकांनी खोलीत जाण्याचा प्रयत्न केला असता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवलं पण शेवटी कुटुंबीयांनी रुममध्ये प्रवेश केला. तेव्हा पत्नीने पतीला नेमकं काय घडलं ते सांगितलं. बाळ सुदृढ, निरोगी आणि सुरक्षित जन्माला आलं होतं. मात्र तिथल्या नर्सने त्याला एका हातानं धरलं होतं, निष्काळजीपणामुळे बाळ तिच्या हातातून खाली पडलं आणि त्याचा मृत्यू झाला आहे. 

नर्सच्या चुकीमुळे मुलाचा मृत्यू झाला, ही बाब लपवण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी बाळाचा आधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र, बाळाच्या आईने लेबर रुममध्ये काय घडलं, याची माहिती कुटुंबीयांना दिली, त्यातून नर्सची चूक असल्याचं लक्षात आलं. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पीएम रिपोर्टमध्ये, मुलाचा पडल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटल