शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

अभिमानास्पद! मनोज नरवणेंची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 13:39 IST

नरवणे ३७ वर्षांपासून लष्कराच्या सेवेत

नवी दिल्ली: लष्करानं मोठे फेरबदल करताना लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणेंची उपप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. सध्या लेफ्टनंट असलेले डी. अंबू ३१ ऑगस्टला निवृत्त होतील. त्यानंतर या पदाची सूत्रं नरवणेंकडे येतील. सेवाज्येष्ठतेनुसार नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या लष्कर प्रमुख असलेले बिपिन रावत ३१ डिसेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर नरवणे हे लष्करातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे लष्कर प्रमुखपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या लेफ्टनंट जनरल असलेल्या रणबीर सिंग यांच्याकडे लष्कर प्रमुख पद दिलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र आताच्या नियुक्तीमुळे नरवणेंकडे लष्कराचं प्रमुखपद येण्याची शक्यता वाढली आहे. मनोज नरवणेंनी आतापर्यंत ३७ वर्षे लष्करात सेवा बजावली आहे. या काळात विविध भागांमध्ये आणि विविध पदांवर काम करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी ईशान्य भारतात  इन्फंट्री ब्रिगेडचं आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचं नेतृत्व केलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्धी असलेल्या नरवणेंनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या ७व्या बटालियनमधून लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली. ईशान्य भारत, जम्मू काश्मीरसह श्रीलंकेत भारतीय शांतता सुरक्षा दलाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर