शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता 'गॅस'वर, महिन्याला वाढणार सिलिंडरची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 21:03 IST

केंद्र सरकारने अनुदानित घरगुती गॅसच्या (एलपीजी) किंमतीत वाढ करण्याचे आदेश सरकारी तेल कंपन्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देमार्च 2017 पर्यंत स्वयंपाकाच्या सिलिंडरवरील अनुदान संपवण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सबसिडी पूर्णपणे बंद होणार आहे.सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना 1 जुलै 2016 पासून प्रति महिना सबसिडी असलेले एलपीजी सिलेंडरची किंमत 2 रुपयांनी वाढविण्यासाठी अधिकार देण्यात आले होते.

नवी दिल्ली, दि. 31 - केंद्र सरकारने अनुदानित गॅसच्या (एलपीजी) किंमतीत वाढ करण्याचे आदेश सरकारी तेल कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे अनुदानित गॅसच्या किंमती प्रत्येक महिन्याला चार रुपयांनी वाढणार आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती लोकसभेत एक प्रश्नाला उत्तर देतांना दिली आहे. पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत स्वयंपाकाच्या सिलिंडरवरील अनुदान संपवण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठीच घरगुती वापराच्या सिलिंडरवरील अनुदान हळूहळू संपवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे त्यांनी लोकसभेत सांगितले.लोकसभेत बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, सरकारी क्षेत्रातील तेल कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत सबसिडी पूर्णपणे संपवण्यासाठी प्रत्येक महिन्यात अनुदानीत एलपीजी सिलेंडरवर (14.5 किलोग्राम) दरमहा 4 रुपये वाढवण्यासाठी सांगण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात 12 सिलेंडर सब्सिडीसह मिळतात. त्यानंतर सिलेंडरवर सबसिडी मिळत नाही. सरकारने यापूर्वी इंडियन ऑइल,  भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या सबसिडीवाल्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत प्रत्येक महिन्याला प्रति सिलेंडर 2 रुपयांनी वाढवण्यास सांगितले होते. आता सरकारने याची किंमत दुप्पट वाढवली आहे. त्यामुळे सबसिडी पूर्णपणे बंद होणार आहे.सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेच्या आडचणीत वाढ झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने आता 1 जून 2017 पासून प्रत्येक महिन्याला प्रति सिलेंडर 4 रुपये वाढवण्यास सांगितले आहे. ही वाढ सबसिडी संपेपर्यंत सुरु राहिल. १८ मार्च 2018 ला सबसिडी पूर्णपणे बंद होईल.सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना 1 जुलै 2016 पासून प्रति महिना सबसिडी असलेले एलपीजी सिलेंडरची किंमत 2 रुपयांनी वाढविण्यासाठी अधिकार देण्यात आले होते. तेव्हापासून तेल कंपन्यांनी 10 वेळा एलपीजी सिलेंडरची किंमत वाढवली आहे. एक जुलैला एलपीजी सिलेंडरची किंमत 32 रुपयांनी वाढली. गेल्या सहा वर्षात ही सर्वात जास्त वाढ आहे. सब्सिडी असलेले एलपीजी सिलेंडरचे दिल्लीमध्ये सध्याचे दर 477.46 रुपये आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये त्याची किंमत 419 .18 रुपये होती. विना अनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 564 रुपये आहे.