Iran War LPG Crisis: अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम (सीझफायर) झाल्यानंतर इंधन पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने मोठी माहिती दिली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले की, देशात LPG, PNG तसेच पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत असून कोणतीही टंचाई नाही.
LPG पुरवठा सुरळीत
मंत्रालयातील संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, देशभरात दररोज सुमारे १ लाख LPG सिलेंडरची विक्री होत आहे. LPG वितरक आणि पेट्रोल पंपांकडे पुरेसा साठा उपलब्ध असून, कोणत्याही कमतरतेची नोंद नाही. तसेच, ९८% LPG बुकिंग ऑनलाइन होत असून घरगुती गॅसचा पुरवठाही नियमित सुरू आहे.
कमर्शियल LPG सप्लाय ७०% पर्यंत पूर्ववत
मंत्रालयाच्या माहितीनुसार, कमर्शियल LPG गॅस पुरवठादेखील ७०% पर्यंत पूर्ववत झाला आहे. १४ मार्चपासून आतापर्यंत सुमारे १ लाख ६ हजार टन LPG विक्री झाली असून दररोज ६,००० ते ६,५०० टन विक्री होत आहे.
५ किलो सिलेंडरबाबत मोठा निर्णय
५ किलो LPG सिलेंडरबाबतही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ओळखपत्राशिवाय मिळणाऱ्या ५ किलो सिलेंडरचा पुरवठा दुप्पट करण्यात आला आहे आहे. तसेच, दररोज सुमारे १ लाख सिलेंडर विक्री होत असून, २३ मार्चपासून आतापर्यंत ११ लाख सिलेंडर विक्री झाली आहे.
PNG वापराला प्रोत्साहन
याशिवाय, नागरिकांना PNG वापराकडे वळवण्यासाठी देशभरात २,४०० हून अधिक जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नैसर्गिक वायू पुरवठ्याबाबत औद्योगिक क्षेत्राला सुमारे ८० टक्के आणि खत क्षेत्राला ९५ टक्के पुरवठा पूर्ववत झाल्याची माहितीही मंत्रालयाने दिली.
Web Summary : Fuel supply is smooth nationwide after the Iran ceasefire. LPG distributors and petrol pumps have sufficient stock. Online LPG bookings are at 98%. Commercial LPG supply has recovered to 70%. PNG usage is being promoted through awareness camps.
Web Summary : ईरान युद्धविराम के बाद देशभर में ईंधन की आपूर्ति सुचारू है। एलपीजी वितरकों और पेट्रोल पंपों के पास पर्याप्त स्टॉक है। ऑनलाइन एलपीजी बुकिंग 98% है। वाणिज्यिक एलपीजी आपूर्ति 70% तक ठीक हो गई है। जागरूकता शिविरों के माध्यम से पीएनजी उपयोग को बढ़ावा दिया जा रहा है।