शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

प्रचाराने गाठली खालची पातळी, यूपीत वातावरण गढूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 01:59 IST

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशातील इतर भागांप्रमाणे उत्तर प्रदेशमध्येही रणधुमाळी सुरू असली तरी या राज्यामध्ये राजकीय पक्षांचे नेते परस्परांवर हीन दर्जाचे वैैयक्तिक आरोप करीत असून प्रचाराची पातळी अत्यंत खालावली आहे.

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशातील इतर भागांप्रमाणे उत्तर प्रदेशमध्येही रणधुमाळी सुरू असली तरी या राज्यामध्ये राजकीय पक्षांचे नेते परस्परांवर हीन दर्जाचे वैैयक्तिक आरोप करीत असून प्रचाराची पातळी अत्यंत खालावली आहे.भाजपाचे बैरिया येथील आमदार सुरेंद्र सिंह यांनी मायावतींवर केलेली टीका असो किंवा उत्तर प्रदेशचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनी राहुल गांधींबद्दल केलेले असभ्य वक्तव्य यामुळे राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे. आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले की, ६० वर्षे वयाच्या असूनही मायावती फेशियल करतात व आपले केस रंगवतात. त्याच्याही पुढे जाऊन या आमदार महाशयांनी यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी व हरयाणाच्या गायिका-नृत्यांगना सपना चौधरी यांची तुलना करीत त्यांच्यावर गलिच्छ टीका केली. सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सपना चौधरी यांना आपलेसे करावे.सुरेंद्र सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे याआधी वादळे उठली आहेत. राहुल गांधी व त्यांची बहीण प्रियांका गांधी वाड्रा म्हणजे रावण व शूर्पणखा आहेत. आपला एके काळचा शत्रू समाजवादी पार्टीशी हातमिळवणी करून मायावतींनी महिलांची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे, अशीही विधाने सुरेंद्र सिंह यांनी केली होती. समाजवादी पक्षाच्या विद्यार्थी नेत्यानेही प्रियांका गांधी यांच्याविरोधात पोस्टर्स लावली असून, ती काँग्रेसच्या टिळक भवन या कार्यालयाबाहेर लावली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक